Milk Industry Agrowon
ताज्या बातम्या

Milk Industry : दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रता आणणार

राज्यातील खासगी, सहकारी दूध संघांच्या बैठकीत ठराव

टीम ॲग्रोवन

पुणे : दूध विक्री दरात वाढ करताना ग्राहक किंमत (एमआरपी) (Milk MRP) रुपये ५४ पेक्षा जास्त नसावी. तसेच डीलर ते ग्राहकांना दिली जाणारी किंमत यामध्ये पाच रूपयांपेक्षा जास्त अंतर नसावे, यातून दरवाढीचा भार ग्राहकांवर पडणार नाही. दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रतेचा अवलंब सर्वांनी करावा, असे धोरण राज्यभरातील खासगी तसेच सहकारी दूध संघांकडून (Co-Operative Milk Organisation) एकमताने ठरविण्यात आले.

परराज्यातील दूग्ध व्यवसायिकांचे राज्यातील होणारे आक्रमण त्यातून दूध खरेदी विक्रीच्या दरावर होणारे परिणाम तसेच अनिष्ट स्पर्धा व इतर अडी-अडचणींबाबत राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज डेअरी येथे झाली.

या बैठकीत संघाचे अध्यक्ष मस्के, पुणे दूध उत्पादक संघाचे राहुल दिवेकर, सोनाईचे धैर्यशील माने, चितळे दूध समुहाचे श्रीपाद चितळे, रणजित सिंह देशमुख, किरीट मेहता, राजू सरगोळीकर, विलास नलावडे,

संजय मिश्रा, मच्छिंद्र लंके, राजहंस, शिवामृत, दूध पंढरी, थोटे, स्फूर्ती, संतकृपा, कात्रज, ऊर्जा, पराग, गोविंद, नवनाथ, कन्हैय्या, कृष्णा, सुरुची, साने, श्री गणेशा इत्यादी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी सदर धोरण ठरविण्यात आले.

या प्रसंगी कात्रज संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

BJP Mahayuti Victory : ...हा तर विक्रमी जनादेश, महाराष्ट्राचा पंतप्रधान मोदींवर विश्वास- फडणवीस

Dry Fruit Imports India : ट्रम्प यांनी इराणाला दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय सुका मेवा व्यापाऱ्यांची चिंता वाढली; आयात ठप्प होण्याची भीती

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल

Nano Fertilizers: शाश्वत शेतीसाठी नॅनो खतांचा वापर गरजेचा

Kidney Sale: किडनी घेता का कुणी किडनी..?

SCROLL FOR NEXT