Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Agrowon
ताज्या बातम्या

Devendra Fadanvis : प्रकल्प गुतरातला जाणे हे महाविकास आघाडीचे पाप

टीम ॲग्रोवन

मुंबई : फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि सॅफ्रन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याची प्रक्रिया महाविकास आघाडी (Maviaa) सरकारचे पाप आहे. मात्र, आमच्या सरकारविरोधात कांगावा केला जात आहे. जिभेला हाडच नसल्याने मनाला येईल ते आरोप विरोधक करत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांनी केला.

तसेच दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर महाराष्ट्रासाठी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांतर्गत पाच हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावाही त्यांनी केला.वेदांता-फॉक्सकॉन आणि पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधक राज्यातील जनतेला थोतांड सांगत आहेत, असा आरोप केला.

ते म्हणाले, तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही, असे जाहीररीत्या सांगितले होते. तर २२ ऑक्टोंबर, २०२१ रोजी टाटा एअरबस प्रकल्प गुजरात किंवा उत्तर प्रदेश येथे जाणार असे सांगितले होते. हा प्रकल्प नागपुरात व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते असताना मी टाटाच्या टीमला जागा दाखवून तेथेच प्रकल्प करण्याची विनंती केली होती. मात्र, गुजरातमध्ये हा प्रकल्प जाईल असे समजल्यानंतर टाटाच्या प्रकल्प प्रमुखांना मी माझ्या निवासस्थानी बोलविले होते.

त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचे सांगितले. हा प्रकल्प गुजरातला जात आहे, याची माहिती प्रकल्पप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकल्पप्रमुखांनी दिली होती. मात्र, आम्ही राजकारणात पडणार नाही, असे सांगत त्यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगणार नसल्याचेही सांगितले होते. या प्रकल्पाचा करार आणि स्थलांतर या दोन्ही गोष्टी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्या आहेत, तरीही ते आता आकांडतांडव करत आहेत. सॅफ्रन प्रकल्पाबाबतही असेच झाले आहे. हा प्रकल्पही नागपुरात होणार असल्याने तो गुजरातला जाऊ दिला, असा आरोपही त्यांनी केला.

मागील सरकारचे अपयश आमच्या माथी महाराष्ट्राला मेडिकल डिव्हाईस पार्क आणि बल्क ड्रग पार्क देऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच जाहीर केले नाही. मात्र, ते दिले नाही म्हणून टीका केली जातेय. याउलट महाविकास आघाडी सरकार सकाळ, दुपार संध्याकाळ मोदींना शिव्या देत होते. हे दोन क्लस्टर कधीच महाराष्ट्रात येणार नव्हते, तरीही त्यावरून टीका केली जातेय. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पाप आमच्या माथी मारले जात आहे. यापुढील काळात अधिकाधिक उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्राला गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर नेऊ, असेही फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT