Irrigation Projects Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation Project : जळगावातील सिंचन प्रकल्प रखडले

Agriculture Irrigation : जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील शेळगाव (ता. जळगाव) बॅरेज, पाडळसे (ता. अमळनेर) येथील तापी नदीवरील निम्म तापी प्रकल्पासह धुळ्यातील काही प्रकल्पांचे व कालव्यांचे काम अपूर्ण आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यासाठी निधीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे. जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील शेळगाव (ता. जळगाव) बॅरेज, पाडळसे (ता. अमळनेर) येथील तापी नदीवरील निम्म तापी प्रकल्पासह धुळ्यातील काही प्रकल्पांचे व कालव्यांचे काम अपूर्ण आहे.

सिंचन प्रकल्प खानदेशात अनेक वर्षे रखडले आहेत. काही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तापी नदीवरील खारियागोटी (मध्य प्रदेश) येथे प्रस्तावित महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाची मंजुरी रखडली आहे. त्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सुमारे सात हजार कोटी रुपये निधी या प्रकल्पाला हवा आहे.

केंद्र सरकारने महाकाय प्रकल्पासाठी काम हाती घेतले आहे. तसेच केंद्राने गिरणा नदीवर मंजूर केलेले सात बलून बंधारेदेखील स्वप्नातच राहिले आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे ११०० कोटी रुपये निधी हवा आहे. त्यासाठी निधी दिलेला नाही.

राज्य शासनाने हाती घेतलेला शेळगाव व पाडळसे येथील तापी नदीवरील प्रकल्पदेखील अपूर्णच आहे. त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली आहे.

गिरणा नदीवर वरखेड (ता. चाळीसगाव) येथे पूर्ण होत आलेला वरखेड लोंढे बॅरेज किंवा प्रकल्पदेखील अपूर्ण आहे. त्याच्या कालव्यावरून सध्या वाद सुरू आहेत. कालवा बंदीस्त किंवा जलवाहिनीद्वारे करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पण शासन याबाबत निर्णय घेत नसल्याची स्थिती आहे.

शेळगाव व पाडळसे प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण होईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. पण हे आश्‍वासन हवेत विरले आहेत. सुमारे दोन हजार कोटी रुपये निधी या प्रकल्पांसाठी हवा आहे. शेळगाव प्रकल्पात १०० टक्के जलसाठा अजूनही होत नसल्याची स्थिती आहे. त्याचे काम ९५ टक्के झाले, पण शेतापर्यंत पाणी केव्हा पोचेल, हा प्रश्‍न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT