Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : विमा परताव्यासाठी २,९६५ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या विमा परताव्यासाठी जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतून फक्त २,९६५ प्रकरणांची पूर्वसूचना विमा कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : अतिवृष्टीने (Heavy Rain) बाधित झालेल्या पिकांच्या विमा (Crop Insurance) परताव्यासाठी जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतून फक्त २,९६५ प्रकरणांची पूर्वसूचना विमा कंपनीकडे (Farmer's Filed Intimation's For Crop Insurance) नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २,६८४ तक्रारी नॅशनल क्रॉप इन्शूरन्स अ‍ॅपच्या (National Crop Insurance App) माध्यमातून नोंदविण्यात आल्या आहेत. यावरून शेतकरी बऱ्यापैकी टेक्नोसॅव्ही झाल्याचे दिसून येत आहे.

नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेतून आर्थिक परतावा दिला जातो. या वर्षी योजनेचे स्वरूप बदलविण्यात आले असून, कप अ‍ॅण्ड कॅप मॉडेल लागू करण्यात आले आहे. जिल्हाभरात या योजनेअंतर्गत २ लाख १५ हजार ५१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

या योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व मका या खरीप पिकांना विमासंरक्षण देण्यात आले आहे. १२ जिल्हा समूहाकरिता असलेल्या या योजनेंतर्गत विमा कंपनी एकूण जमा विमाहप्ता रकमेच्या ११० टक्क्यांपर्यंतचे दायित्व स्वीकारणार आहे. त्यापेक्षा जास्त नुकसान असल्यास त्याचा भार शासन स्वीकारणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २,९६५ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दिल्या आहेत. यामध्ये २,६८४ शेतकऱ्यांनी नॅशनल क्रॉप इन्शूरन्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रकरणे दाखल केली आहेत. तर टोल फ्री क्रमांकावर ८६, ई-मेलच्या माध्यमातून ६४ व थेट कंपनीकडे जाऊन १३१ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

पूर्वसूचना देणारे शेतकरी

अचलपूर (७३), अमरावती (१२३), अंजनगावसुर्जी ( २३), भातकुली (१२६), चांदूररेल्वे (१४६), चांदूरबाजार (११५), चिखलदरा (७), दर्यापूर (१४८), धामणगावरेल्वे (१५२), धारणी (५), मोर्शी (२३५), नांदगाव खंडेश्वर (१६९६), तिवसा (५६), वरुड (६०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT