Grapes
Grapes Agrowon
ताज्या बातम्या

Grapes :उत्पादन खर्च कपातीसाठी करणार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : ‘‘द्राक्ष पिकात वातावरणीय बदलांमुळे समस्या येत आहेत. त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च दबावात आणण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी द्राक्ष संघातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरील द्राक्षतज्ञ व सल्लागारांचे मार्गदर्शन मिळवून देणार आहे’’, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार (Shivajirao Pawar) यांनी केले.

द्राक्ष बागायतदार संघातर्फे २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान वाकड (पुणे) येथील हॉटेल टीपटॉप इंटरनॅशनल येथे ‘द्राक्ष परिषद’ झाली. परिषदेच्या समारोपप्रसंगी पवार यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

या वेळी उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, सोलापूर अध्यक्ष प्रशांत देशमुख, सांगलीचे विभागीय अध्यक्ष संजय बारगले, पुणे विभागीय अध्यक्ष भारत शिंदे, सांगलीचे मानद सचिव प्रफुल्ल पाटील, सोलापूर विभागीय मानद सचिव हाजी गौस अहमद सैपन शेख आदी उपस्थित होते. या वेळी राज्यातील विभागीय सदस्य व सभासद उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘सांगली व सोलापूर विभागात अद्ययावत प्रयोगशाळांची उभारणी करणार आहे. यासह नुकत्याच केलेल्या दिल्ली दौऱ्यात ‘अपेडा’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक झाली. सांगली येथील बेदाण्याला भौगोलिक चिन्हांकन मिळाले आहे. त्या अनुषंगाने बेदाणा उत्पादनाचे चांगले नियोजन करण्यासाठी एक परिषद घडवून आणायची आहे.’’

सांगलीचे विभागीय सदस्य डॉ. चनगोंडा हविनाळे यांनी पुणे विभागासाठी मांजरी येथील कार्यालय बांधकाम स्थिती काय व सांगली तसेच सोलापूर येथील प्रयोगशाळेचे नियोजन काय? अशी विचारणा केली. यावर ‘तांत्रिक परवानगी आल्यानंतर निर्णय घेऊ,’ असे उत्तर खजिनदार पवार यांनी दिले.

काही संचालकांची प्रथम निवड झाली. त्या यादीतील नावे प्रकाशित अहवालात का नाहीत, चारही विभागात तफावत का, असा प्रश्न पुणे विभागीय संचालक अभिषेक कांचन (Abhishek Kanchan) यांनी विचारला. यावर नाराजीचा सूर दिसून आला. मात्र नजरचुकीने झाले असल्याचे सांगून सुधारणा करण्याचे आश्वासन कार्यकारिणीने दिले. आगामी नाशिक विभागीय चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय द्राक्ष मार्गदर्शक रॉड्रिगो यांना बोलवावे, अशी मागणी आहे. यावर ऑक्टोबरमध्ये चर्चासत्र होईल. राज्यातील सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले.

बैठकीत केलेल्या मागण्या...

- वार्षिक किमान ५ ते ६ बैठका व्हाव्यात, अशी सूचना

- सांगली विभागात गुणवत्तापूर्ण बेदाणा निर्मितीसाठी नामांकित तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करावे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT