Health Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Health Scheme : वंचित, गोरगरिबांना आरोग्य योजनांची माहिती द्यावी

केंद्र व राज्य शासन दरवर्षी आरोग्य विषयक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करीत असते. परंतु लोकांना या योजनांची माहिती नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात.

Team Agrowon

सोलापूर : ‘‘केंद्र व राज्य शासन दरवर्षी आरोग्य विषयक योजनांसाठी (Health Scheme) मोठ्या प्रमाणात निधीची (Government Fund) तरतूद करीत असते. परंतु लोकांना या योजनांची माहिती नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात.

महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनांच्या रूपाने लोकांना एक संजीवनी मिळाली आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून वंचित व गोरगरीब गरजूंना शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करा,’’ अशा सूचना उपसंचालक (आरोग्य सेवा), पुणे डॉ. राधाकृष्ण पवार यांनी केल्या.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पिंपळे आदी उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाले, ‘‘संस्थात्मक प्रसूती वाढविण्यासाठी गरोदर मातांचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात शिबिरांचे आयोजन करावे. आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती देऊन या सर्व सेवा त्यांना मिळतील, याचा विश्‍वास द्या, तरच लोक सेवा घेण्यासाठी आपल्या संस्थेत येतील. कुटुंब कल्याण अंतर्गत सर्व सेवांची माहिती लोकांना द्यावी. गैरसमजुतींबाबत लोकांचे समुपदेशन करावे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Pik Pahani : पीक पाहणीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ; महसूलमंत्री बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

Agrowon Podcast: केळीचा भाव टिकून; कापूस स्थिरावला, कांदा दबावात, मिरचीला उठाव टिकून तर बेदाण्याला उठाव

Bajra Farming: खानदेशात बाजरी पीक निसवले

Pre Monsoon Rain: विदर्भात ४ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात बुधवारी आणि गुरुवारी पूर्व मोसमी पावसाची शक्यता

Kabul Airstrike Attack: काबुलमध्ये पाकिस्तानचा हॉस्पिटलवर एअर स्ट्राईक; ४०० हून अधिक मृत्यू, नशामुक्ती केंद्र उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT