Anuradha Vipat
परीक्षेचा काळ जवळ आला की विद्यार्थ्यांमध्ये भीती, चिंता आणि ताण जाणवणे अत्यंत सामान्य आहे.
थोडा ताण अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो, परंतु हा ताण प्रमाणाबाहेर वाढल्यास त्याचा परिणाम स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आरोग्यावर होऊ लागतो.
परीक्षेच्या शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी अभ्यासाचे नियोजन करा. कठीण विषयांना अधिक वेळ द्या.
सलग तासनतास अभ्यास करण्याऐवजी २५ मिनिटे अभ्यास करा आणि ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.
पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदू थकतो आणि परीक्षेच्या वेळी आठवलेले मुद्दे विसरायला होते. त्यामुळे रात्रीची पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची आहे.
जंक फूड किंवा अति तेलकट खाणे टाळा. आहारात बदाम, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा.
जेव्हा जेव्हा अभ्यासाचा कंटाळा येईल किंवा भीती वाटेल, तेव्हा २ मिनिटे डोळे बंद करून नाकाने खोल श्वास घ्या आणि तोंडातून हळूवार सोडा.