Soybean Disease Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Disease : हजारो हेक्टर सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

Soybean Crop Management : नांदेड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘केडीएस ७२६’ (फुले संगम) या वाणाला पसंती दिली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केलेल्या हजारो हेक्टर सोयाबीनवरील पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, मुदखेड, अर्धापूर, उमरी या तालुक्यांसह इतरही सर्वच तालुक्यांत सोयाबीन पीक पिवळे पडून वाळून जात आहे.

हा रोग ‘केडीएस ७२६’ (फुले संगम) या वाणावर अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर भेट देऊन उपाययोजना सुचविल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘केडीएस ७२६’ (फुले संगम) या वाणाला पसंती दिली. परंतु सध्या जिल्ह्यातील सर्वच भागांत या वाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीनवर मुळकुज, खोडकुज या रोगांबरोबरच खोडमाशी व चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

दरम्यान, पोखर्णी केव्हीकेच्या तज्ज्ञांनी मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादकां‍च्या शेतावर भेटी देऊन पाहणी केली. या वेळी नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, केव्हीकेचे पीक संरक्षण तज्ज्ञ प्रा. माणिक कल्याणकर, तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुळे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या.

या प्रक्षेत्र भेटीदरम्यान बारसगाव सोयाबीन पीक अकाली पिवळे पडल्याचे व झाडे वाळून जात असल्याचे दिसून आले. खोडमाशी व चक्रीभुंगा यांचाही प्रादुर्भाव काही प्रमाणात आहे. या रोगांमध्ये प्रामुख्याने मूळकुज, अँथ्रॅकनोज इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे प्रा. कल्याणकर यांनी सांगितले.

या वर्षी पावसाच्या खंडामुळे पिकास ताण येऊन ही बुरशी वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले. सोयाबीनच्या दीर्घ कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या वाणांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव जास्त आहे. काही लवकर पक्व होणाऱ्या वाणांमध्ये पीक पक्व अवस्थेकडे असल्यामुळे पाने पिवळी पडल्याचे आढळून आले. सोयाबीन पिकातील पाने पिवळी पडून वाळून झाडावर तसेच राहत असतील, तर हा रोगामुळे झालेला प्रकार समजावा आणि जी पाने पिवळी पडून गळून पडत आहेत.

त्या ठिकाणी पक्वता अवस्था आलेली असते. या रोगावर उपाययोजना करताना एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, रोगास सहनशील वाणांची निवड करावी, पेरणीपूर्वी बियाण्यास शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करावी, पिकांची फेरपालट करावी, मिश्र पीक पद्धतीमुळे रोगाचा प्रसार रोखण्यात मदत होते.

पुढील पिकात रोगकारक बुरशीचा मातीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी पीक पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी एकरी तीन किलो शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून शेतात टाकावी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन प्रा. कल्याणकर यांनी केले.

दीर्घ कालावधीच्या सोयाबीनवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. कंदकुज, खोडकुज या रोगांबरोबरच खोडमाशी व चक्रीभुंगा यांचाही प्रादुर्भाव काही प्रमाणात आढळून आला. प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
- प्रा. माणिक कल्याणकर, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्र, नांदेड
मुदखेड तालुक्यातील अनेक गावात हजारो हेक्टरवर पिकांची नासाडी झाली आहे. याबाबत विमा कंपनी तसेच शासनाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
- नीलेश देशमुख, शेतकरी, बारड (ता. मुदखेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT