Solar Energy Agrowon
ताज्या बातम्या

Solar Energy : छतावरील सौरऊर्जा निर्मितीला वीज ग्राहकांची वाढती पसंती

घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली, तर महावितरणला विकायची या ‘रूफटॉप सोलर’ योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे.

Team Agrowon

नाशिक : घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती (Solar Energy) पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज (Electricity) स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली, तर महावितरणला विकायची या ‘रूफटॉप सोलर’ योजनेला (Rooftop Solar Scheme) महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे.

त्यांची राज्यातील संख्या ७६ हजार ८०८ इतकी झाली आहे. त्यांच्याकडून एकूण १,३५९ मेगावॉट इतकी विद्युतनिर्मिती क्षमता गाठली गेली आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले, की राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६-१७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहक २० मेगावॉट सौरऊर्जा ‘रूफटॉप’ पद्धतीने निर्माण करत होते.

गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. एकूण ग्राहकांची संख्या ७६ हजार ८०८ झाली आहे. तर सौरऊर्जा निर्मितीची क्षमता १ हजार ३५९ मेगावॉटवर पोहोचली आहे.

२०२१-२२ या आधीच्या आर्थिक वर्षात राज्यातील ‘रूफटॉप सोलर’ योजनेत सौरऊर्जा निर्मितीच्या बाबतीत एक हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला गेला.

त्यानंतर चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून वाढत्या संख्येने ग्राहक सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘रूफटॉप’ सोलरला पसंती देत आहेत.

गेल्या दहा महिन्यांत राज्यात घरावर सौरऊर्जा निर्मिती संच बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या २० हजार ७२२ ने वाढली आहे. तर या प्रकारची सौरऊर्जा निर्मिती क्षमता ३३१ मेगावॉटने वाढली आहे.

तीन किलोवॉटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे १ लाख २० हजार खर्च येतो. त्यामध्ये अंदाजे ४८ हजार रुपये म्हणजे ४० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास ७२ हजार रुपये खर्च येतो.

ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते.

सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो. तसेच त्याचा उपयोग २५ वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे.

पर्यावरण संवर्धनासह आर्थिक लाभ

ग्राहकांनी ३ किलोवॉट ते दहा किलोवॉट क्षमतेचे पॅनेल्स बसविले, तर २० टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. औद्योगिक ग्राहकही या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत.

इच्छुकांनी महावितरणच्या ‘महाडिस्कॉम डॉट इन/आयस्मार्ट’ या वेबसाइटवर अर्ज करावा. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतींत महावितरणची मदत मिळते. सौरऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते, तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT