Jayakwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, जलाशय पूर्ण क्षमतेने भरणे कठीण

Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज जोर कमी झाला आहे. त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवकही घटली आहे.

Swapnil Shinde

Maharashtra Dam News : नाशिक जिल्ह्यात शुक्रवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जायकवाडी धरणात येणारी आवक देखील घटली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 34.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदा मान्सूनच्या पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यात मराठवाड्यात जून आणि ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहेत. पावसात मोठा खंड झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होत गेली. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांचे चिंता वाढली होती.

गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तसेच गोदावरी नदीला पूर आल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली होती. रविवारी संध्याकाळी 6 वाजता धरणात 15 हजार 925 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. मात्र, आजपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पावसाची आवक घटली असून, 13 हजार 78 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.

जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती (सकाळी 6 वाजेपर्यंत)

धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.18 फूट

धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.388 मीटर

एकूण पाणीसाठा दलघमी : 1482.335 दलघमी

जिवंत पाणीसाठा दलघमी : 744.229 दलघमी

जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 34.28टक्के

जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 13 हजार 78 क्युसेक

जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.583

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT