Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : गाळपाच्या ऊसक्षेत्रात २० हजार हेक्टरने वाढ

Sugarcane Crushing Area : जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा काठाची ओळख ऊसपट्टा अशी आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यात उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे.

Team Agrowon

Sugarcane Crop : सांगली ः जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा काठाची ओळख ऊसपट्टा अशी आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यात उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांसह दुष्काळी तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळपास जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात २० हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल ५५ टक्क्यांनी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठासह दुष्काळी पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढत आहेत. दुष्काळी भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ योजना सुरू आहेत. या योजनेतून वर्षातून तीन आवर्तने सोडली जातात. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेती पाण्याखाली आली आहे. शाश्वत पाण्याची सोय झाल्याने आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढला आहे. त्यामुळे या तालुक्यातही उसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला. परतीचाही पावसाने दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे भूजपातळीत वाढ झाली. यासाऱ्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी पुढे आले आहेत. २०२१-२२ पासून जिल्ह्यात दरवर्षी २० हजार हेक्टरने क्षेत्र वाढ आहेत. यंदा १ लाख ४४ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक उसाचे क्षेत्र वाळवा तालुक्यात आहे. जत तालुक्यात ११ हजार ६५७ हेक्टरवरील उस गाळपास जाणार आहे. आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही उसाचे क्षेत्र वाढले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain: मराठवाड्यात ३ दिवस पावसाला पोषक स्थिती; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज

Crop Loan Distribution: पीक कर्जवाटप संथ गतीने सुरू

Crop Loss: बदलत्या हवामानाचा फटका आंबा अन्‌ शेवगा पिकांना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हप्ता का रखडला? ‘या’ ४ चुका ठरल्या कारणीभूत; १५०० रुपये का थांबले, जाणून घ्या एका क्लिकवर

Banana Price: केळीची जाहिर दरांपेक्षा कमी दराने खरेदी

SCROLL FOR NEXT