Farmers Issues: खानदेशात पीक कर्जवाटप संथ गतीनेच सुरू आहे. सुमारे तीन हजार नवे कर्जप्रस्ताव बँकांमध्ये पडून आहेत. .राष्ट्रीयीकृत बँका वर्षभर पीक कर्ज वितरित करतात. रब्बी हंगामातही या बँकांकडून अधिकचे पीक कर्ज वितरण अपेक्षित असते. यंदा रब्बी हंगामात खानदेशात सुमारे ९०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु रब्बी हंगाम पूर्ण होऊनही पीक कर्ज वाटप लक्ष्यांकाएवढे झालेले नाही..Crop Loan Distribution: पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करा: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी .जळगाव जिल्ह्यात सुमारे ६५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण रब्बी हंगामात अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यात बँकांकडून पीक कर्ज वितरणाबाबत समाधानकारक कार्यवाही सुरू नाही. पुढे आता खरिपातील पीक कर्ज वितरण सुरू होणार आहे. त्यासंबंधी प्रशासनाने बैठक, लक्ष्यांक जाहीर केलेला नाही. परंतु यंदाही खरिपात खानदेशात मिळून सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये पीक कर्ज वितरण होईल, अशी अपेक्षा आहे..Crop Loan Distribution: अमरावतीत रब्बी हंगामात बारा टक्के पीककर्जाचे वितरण.पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्र गोळा केली आहेत. त्यात फेरफार नोंदी, शेतजमिनीचे मूल्यांकन मिळविताना अधिकचा त्रास झाला. यात अनेक दिवस गेले. यानंतर पीक कर्जासाठी बँकेत नव्याने प्रस्ताव सादर केले. पण बँक त्यावर निर्णय घेत नाही. अनेक बँकांमध्ये व्यवस्थापक प्रभारी आहेत. काही शाखांमधील अधिकारी प्रशिक्षणार्थ बाहेर आहेत. यामुळेदेखील पीक कर्जाबाबत निर्णय होत नसल्याची माहिती आहे. रब्बी हंगामात पपई, केळी, भाजीपाला पिके लागवडीसाठी पीक कर्जाची गरज आहे..राष्ट्रीयीकृत बँकांना पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक अधिक आहे. त्यापाठोपाठ जिल्हा बँकांना लक्ष्यांक आहे. धुळे व नंदुरबारात जिल्हा बँकेला रब्बीमध्ये पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांकच नव्हता. आता खरिपात जिल्हा बँका पीक कर्ज वितरण करतील. जळगाव जिल्हा बँक दरवर्षी खरिपात सुमारे ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे पीक कर्ज देते. जिल्हा बँका एप्रिलमध्ये पीक कर्ज वितरण खरिपासंबंधी सुरू करणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.