Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भावात वाढ नवीन

पाले खुर्द आणि वावंजेतील गुरांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; पशु वैद्यकीय विभागाने विशेष खबरदारी घेतली असून पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी आढावा घेतला आहे.

टीम ॲग्रोवन

पनवेल : लम्‍पी आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्‍याने राज्यातील पशुपालक (Livestock) चिंतेत आहेत. पनवेल तालुक्याच्या वेशीवर लम्‍पीसदृश आजाराची लक्षणे आढळल्‍याने पाले खुर्द आणि वावंजेतील गुरांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; पशु वैद्यकीय विभागाने विशेष खबरदारी घेतली असून पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर (Vijay Talekar) यांनी आढावा घेतला आहे.

राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांत अनेक जनावरांना लम्‍पी आजाराची लागण झाली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात आधी कर्जतमध्ये आठ बैलांना बाधा झाल्‍याचे आढळले.

त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून सर्वच तालुक्‍यांत गुरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील दोन गावांतील गुरांमध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळल्‍याने त्‍यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

लम्पी केवळ गोवंश व म्‍हैस‍ वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्‍वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असल्‍याने पशुपालकांनी गुरांची योग्‍य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात जवळपास १३,२२६ जनावरे आहेत. त्यापैकी ४,५७२ गोवंशीय व ५,६६० म्‍हैसवर्गीय आहेत. तालुका प्रशासनाने गावागावांत सर्वेक्षण सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT