Ground Water Level  Agrowon
ताज्या बातम्या

Ground Water Level : भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत वाढ

परभणी जिल्ह्यातील स्थिती

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः भूजल सर्वेक्षण ( Ground Water Survey) आणि विकास यंत्रणेतर्फे यंदाच्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या निरीक्षण नोंदीनुसार परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत (Ground Water Level ) सरासरी पातळीपेक्षा वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पूर्णा तालुक्यातील पाणीपातळी (Water Level ) सर्वाधिक वर म्हणजे २.१० मीटर, तर सोनपेठ तालुक्यातील पाणीपातळी सर्वाधिक खोल म्हणजे ४.२२ मीटर आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणे अंतर्गत वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षक विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यातील तसेच सततचा  पाऊस, अतिवृष्टीमुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी मुरल्यामुळे विहिरी, विंधन विहिरी आदी सिंचन स्रोतांच्या पाणी पातळीत वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातील नोंदीनुसार २०१७ ते २०२१ या पाच वर्षांतील सरासरी पातळीच्या तुलेनेत १.५२ ते ५.९१ मीटरने  वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरासरीच्या तुलनेत पालम तालुक्यातील पाणीपातळीत सर्वाधिक म्हणजे ५.९१ मीटरने आणि पूर्णा तालुक्यातील पाणीपातळीत सर्वांत कमी १.५२ मीटरने वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे झालेली भूजल पातळीतील वाढ ऑक्टोबर महिन्यातील नोंदणीनंतर समजू शकेल.

सिंचन स्रोत तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्‍भवण्याची शक्यता दिसत
नाही. विविध कामांसाठी वापर करताना बेसुमार उपसा, पाण्याची नासाडी टाळणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT