Cotton Rate
Cotton Rate Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Rate : खानदेशात कापसाच्या आवकेत वाढ

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात कापूस दर (Cotton rate) कमीच आहेत. सध्या प्रतिदिन सात हजार गाठी (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक (Cotton Arrival) बाजारात होत आहे.

खेडा खरेदीत कापसाला कमाल ७७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. ७४००, ७५०० व ७७०० रुपये, असे दर आहेत.

कापूस दर कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कारण उत्पादन खर्च एक क्विंटलसाठी पाच हजार रुपये असा आला आहे.

कापसाची आवक फेब्रुवारीच्या मध्यानंतर हळूहळू वाढली आहे. डिसेंबर व जानेवारीत प्रतिदिन सरासरी साडेचार हजार गाठींच्या कापसाची आवक खानदेशात झाली. ही आवक या महिन्यात वाढली आहे.

जशी आवक वाढली, तसे दरही दबावात आहेत. खानदेशातील काही स्थानिक कारखाने बऱ्यापैकी सुरू असून, त्यात प्रक्रिया सुरू आहे. तसेच गुजरातमध्येही एजंट कापसाची पाठवणूक करीत आहेत.

कापूस दरात वाढीची प्रतीक्षा अनेकांना आहे. खानदेशात सुमारे ६० टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.

मागील हंगामात मार्चपर्यंत ९० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. मागील वेळेसही कमाल शेतकऱ्यांना ७१००, ७५००, ७८०० ते ८२५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

फक्त आठ ते १० टक्के शेतकऱ्यांनाच १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. यंदा मात्र मार्चपर्यंत ६० टक्केच कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.

कापसाची अधिकची आवक जामनेर, पाचोरा, अनळनेर, पारोळा, बोदवड, धरणगाव भागात सुरू आहे. यावल, चोपडा, जळगाव, चाळीसगाव, भडगाव भागात कापूस आवक कमी आहे.

धुळ्यातही शिरपूर भागात ७० टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे. नंदुरबारातही सुमारे ७० टक्के कापसाची विक्री झाली आहे.

खानदेशात यंदा सुमारे २५ लाख गाठींचे उत्पादन जिनिंग प्रेसिंग कारखान्यांत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु खरेदीदार, कारखानदार दरातील अस्थिरतेमुळे सावध आहेत. परिणामी कापूसगाठींच्या उत्पादनावरही परिणाम होईल, असे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT