Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Disease : खारेपाटातील शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Paddy Farming : पेण तालुक्‍यात खारेपाटात सर्वाधिक भाताची शेती केली जाते. काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्‍याने, तसेच बदलेल्‍या वातावरणामुळे पिकावर करपा रोगाची लागण झाल्‍याचे बळीराजा चिंतेत आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : पेण तालुक्‍यात खारेपाटात सर्वाधिक भाताची शेती केली जाते. काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्‍याने, तसेच बदलेल्‍या वातावरणामुळे पिकावर करपा रोगाची लागण झाल्‍याचे बळीराजा चिंतेत आहे.

सध्या भात पिके चांगली तरू लागली आहेत, दाणा भरण्यास सुरुवात झाली आहे, मात्र रोगामुळे संपूर्ण पाती मुळासकट लाल पडते आहे. वेळीच उपाययोजना न केल्‍यास पीक वाया जाण्याची शक्‍यता असल्‍याने काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली.

यंदा पाऊस उशीर सुरू झाल्‍याने सुरुवातीला भाताची रोपे करपली तर लावणीनंतर अतिवृष्‍टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्‍याने पीक कुजल्‍याने नुकसान झाले. आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

त्‍यामुळे कृषी विभागाने शेतावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी तसेच प्रतिबंधात्मक औषध फवारणी व औषध उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बेनवले गावात कृषी अधिकाऱ्यांनी नुकतीच शेतावर जाऊन पिकाची पाहणी असता भाताची पाती लाल पडल्‍याचे आढळले.

त्‍यानुसार रोप तपासणीसाठी पाठवल्‍याची माहिती पेण कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली. पिकावरील औषध फवारणीसाठी आवश्‍यक मात्रांबाबतही कृषी विभागाकडून माहिती दिली जात आहे. भाजीपाला पिकावरही किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT