Samrudhhi Mahamarg Agrowon
ताज्या बातम्या

Samrudhhi Mahamarg : पंतप्रधानांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये रविवारी (ता. ११) येणार असून त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. नागपुरमध्ये पंतप्रधान सुमारे सव्वातीन तास असणार आहेत.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नागपूरमध्ये रविवारी (ता. ११) येणार असून त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्‍घाटन (Samrudhhi Mahamarg Inauguration) करण्यात येणार आहे. नागपुरमध्ये पंतप्रधान सुमारे सव्वातीन तास असणार आहेत. सकाळी ९.२५ वाजता ते दिल्लीवरून नागपूर विमानतळावर येणार आहेत. १२.५० वाजता ते परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फक्त समृद्धी महामार्गच नव्हे तर नागपूर मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‍घाटन होणार आहे. सोबतच नागपूर रेल्वे स्थानकावर ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मोदी यांचा अधिकृत दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

त्यानुसार ते सकाळी ७.५० ला दिल्ली विमानतळावरून निघणार आहेत. नागपूर विमानतळावर ते ९.२५ला दाखल होतील. तेथून ते गाडीने ९.४० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचतील. ९.४५ ते ९.५५ अशी दहा मिनिटे ते येथे थांबणार आहेत.

वंदे भारत एक्स्पेसला हिरवी झेंडी दाखवून ते मेट्रो रेल्वेच्या झिरो माईल चौकातील फ्रिडम पार्क प्रदर्शनाला भेट देणार आहे. येथूनच ते मेट्रोतून खापरी स्थानकापर्यंत सफर करणार आहेत. १०.३० वाजता केपी ग्राऊंड ते ऑटोमोटिव्ह चौक तसेच सीताबर्डी ते प्रजापतीनगर या दोन मेट्रो रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील.

त्यानंतर १०.४५ वाजता समृद्धीच्या झिरो माईल येथून समृद्धी महामार्गावर १० किलोमीटर प्रवास करून ते उद्‍घाटन करतील. त्यानंतर एम्सच्या टेंपल ग्राउंडवर ते संबोधित करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT