Grape Season
Grape Season Agrowon
ताज्या बातम्या

Indo Grapes Development Council : इंडो-ग्रेप्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे उद्‌घाटन; संचालकांची प्राथमिक बैठक

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्रातील, किंबहुना देशातील प्रथम पीक विकास परिषद स्थापन करण्याचा बहुमान द्राक्ष पिकास मिळाला असून ‘इंडो ग्रेप्स डेव्हलपमेंट कौन्सिल’ या नावाने द्राक्ष विकास परिषदेची ३१ मार्च २०२३ रोजी नोंदणी कलम ८ नुसार अंतर्गत ना- नफा कंपनी म्हणून करण्यात आली आहे.

सदरहू प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान(व्हीएसटीएफ) या अंमलबजावणी यंत्रणेने ग्रँट थॉर्नटन भारत एलएलपी या तांत्रिक सेवा पुरवठादाराच्या साहाय्याने ‘आयजीडीसी’चे उद्‌घाटन व या परिषदेच्या संचालक मंडळाची प्राथमिक बैठक नुकतीच कृषी महाविद्यालय, पुणे येथे झाली.

या कार्यक्रमाला ‘व्हीएसटीएफ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम दिघे, ‘स्मार्ट’चे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे या सदस्यांच्या उपस्थितीत समारंभाचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच सर्व सदस्यांच्या वतीने ‘आयजीडीसी’च्या नोंदणी प्रमाणपत्राचे विमोचन करण्यात आले.

संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी सचिव अमोल पाटील यांनी स्वतंत्र बँक खाते उघडणे, कंपनीचे कार्यालय निच्छिती, लेखा संबंधित पूर्तता करणे, प्राथमिक भाग भांडवल जमा करणे, आदी विषयी उपस्थित संचालकांना माहिती दिली.

या कार्यक्रमाला ‘सह्याद्री फार्म्स’चे विलास शिंदे, एमआरडीबीएसचे अध्यक्ष शिवाजी पवार, ‘महाग्रेप्स’चे सचिन कोरडे, द्राक्ष निर्यातदार संघटनेचे श्री. खापरे, ‘अपेडा’चे अनिल मेहेर आणि नागपाल लोहकरे उपस्थित होते.

या वेळी विलास शिंदे म्हणाले, की द्राक्ष मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी जलद आणि ध्येयाभिमुख कृती करण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर संपूर्ण मूल्य साखळीचा सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून भागधारकांनी एकजुटीने काम केले पाहिजे आणि सदर परिषदेत महाराष्ट्राच्या द्राक्ष उद्योगाला चालना आणि बळकटीकरण करण्याच्या समान उद्दिष्टासाठी सर्व भागधारक कार्य करतील असा ठराव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT