Soil Health Agrowon
ताज्या बातम्या

Soil Health : चिबड जमिनीसाठी पाणी निचरा प्रणाली राबवा

Agriculture Land Management : कापसाच्या उथळ ते खोल काळ्या जमिनीतून पाऊस व सिंचनाच्या पाण्याचा निचरा अत्यंत कमी होतो. त्यामुळे जमीन चिबडून नापिकी होते.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात चिबड जमीन सुधारणा योजना अमलात आणण्याची मागणी शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी केली होती. त्याची दखल घेत आमदार मदन येरावार यांनी चिबड जमिनीसाठी पाणी निचरा प्रणाली राबवावी, अशी मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात गेल्या २० वर्षांत नापिकीमुळे साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कापसाच्या उथळ ते खोल काळ्या जमिनीतून पाऊस व सिंचनाच्या पाण्याचा निचरा अत्यंत कमी होतो. त्यामुळे जमीन चिबडून नापिकी होते.

केंद्रीय भूजल मंडळाने जिल्ह्यातील भूविज्ञानाच्या दृष्टिकोनातून जलचर अहवालाचा अभ्यास केला. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ६५ टक्के चिबड जमीन आहे. जमीन उथळ ते खोल कापसाची काळी माती, अल्कधर्मी पीएच ७.२ व पाण्याचा निचरा अत्यंत कमी आहे.

नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अ‍ॅण्ड लॅण्ड यूज प्लॅनिंगनुसार यवतमाळ जिल्ह्यातील निम्मी जमीन ही मुळात कापसाला उपयुक्तच नसल्याचे समोर आले आहे. कर्जमाफी हा केवळ तात्पुरता उपाय आहे.

जिल्ह्यात २१४७ गावांतील चिबड जमीन सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व नानाजी कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत शेत बांधबंदिस्ती, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, सच्छिद्र पाइप निचरा प्रणाली, गुरे प्रतिबंधक चर, ढाळीची बांधबंदिस्ती, अनघड दगडांचे बांध, नाला खोलीकरण, शेततळे शंभर टक्के अनुदानावर राबविण्याची मागणी येरावार यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. जिल्ह्यात केवळ २५.०४ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू स्थितीत कापसासाठी योग्य आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

जिल्ह्यात २१४७ गावांतील चिबड जमीन सुधारण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व नानाजी कृषी संजीवन प्रकल्पांतर्गत योजना राबवावी, अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली. त्याची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्‍यांना दिलासा मिळेल.
-मिलिंद दामले, प्रमुख, शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT