SEBI Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Vaydebandi : वायदेबंदी उठवा; अन्यथा ‘सेबी’समोर धरणे धरू

स्वतंत्र भारत पक्षाने २३ जानेवारीपासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘सेबी’च्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे.

Team Agrowon

नांदेड : केंद्र सरकारने सोयाबीन (Soybean), चना (Chana), तूर, गहू या पिकांसह नऊ शेतीमालावर लावलेल्या वायदा बाजार बंदीला (Vayadebandi) दिलेली मुदतवाढ रद्द करा, अन्यथा मुंबई येथील ‘सेबी’ (SEBI कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाने केंद्र सरकारला दिला.

स्वतंत्र भारत पक्षाने २३ जानेवारीपासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘सेबी’च्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी संघटनेला मान्य आहेत.

शेतकऱ्यांना मारक असलेल्या वायदेबंदीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात येणारा निर्णय ‘सेबी’ने तातडीने मागे घ्यावा व सर्व शेतीमालाचे वायदे सुरू ठेवावेत. तसे झाले नाही तर २३ जानेवारीपासून ‘सेबी’च्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धोंडीबा पवार, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, आर. पी. कदम यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

Kharif Crop Loss: पावसाच्या खंडाने खरीप पिके संकटात

e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT