Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : विमा भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण सुरूच

Team Agrowon

कनेरगाव नाका, जि. हिंगोली ः प्रलंबित पीकविमा भरपाई (Crop Insurance Compensation) प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghatana) गोरेगाव (ता. सेनगाव) येथील अप्पर तहसिल कार्यालयासमोर बुधवार (ता. १८) पासून सुरू असलेले बेमुदत उपोषण ठोस तोडगा निघत नसल्यामुळे रविवारी (ता. २२) पाचव्या दिवशी सुरु होते.उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून रविवारी (ता.२२) गोरेगाव आणि सेनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

कनेरगाव हिंगोली मार्गावरील वाहनांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव तसेच परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मात्र, विमा कंपन्या संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देण्यास तयार नाहीत. २०२०-२१ मधील १३ कोटी ८९ लाख रुपये पीकविमा भरपाई अद्याप मिळालेली नाही.

या प्रश्नी या पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर लेखी आश्वासन दिले होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे बुधवार (ता.१८) पासून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव पतंगे, गजानन कावरखे, रावसाहेब अडकिणे, ऋषिकेश बर्वे, बापूराव गरड यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT