Waghadi River
Waghadi River Agrowon
ताज्या बातम्या

Waghadi River : ‘वाघाडी’ च्या स्वच्छतेसाठी शेकडो हात सरसावले

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत यवतमाळ पालिका (Yavatmal Municipal Council) प्रशासनाच्या वतीने वाघाडी नदीपात्र स्वच्छता व पुनरुज्जीवन अभियानासाठी शहरातील पर्यावरणवादी संस्था सरसावल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे, (Amol Yegde) मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर (Dadarao Dolharkar)यांच्या उपस्थितीत दर रविवारी श्रमदान करण्याचा संकल्प करण्यात आला.

प्रशासनाच्या पुढाकारातून वाघाडी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शेकडो हातदेखील सरसावले आहेत.वाघाडी येथे स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी ‘जगा आणि जगू द्या’ हे ब्रीद स्वीकारून अहिंसा, शांती आणि स्वच्छता हा मंत्र आपल्याला दिला.

त्याचा अंगीकार करून सर्वांनी मानवी जीवन समृद्घ करण्यासाठी संकल्पबद्घ व्हावे, असे आवाहन केले. याप्रसंगी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा, राजू नीवल, लायन्स क्लब, रोटरी क्लब, लायन्स फॉर्मा, नेहरू युवा केंद्र, योगनृत्य परिवार, ज्येष्ठ नागरिक मंडळ, प्रयास, पर्यावरण संरक्षण गतिविधी,

महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, सावली स्वयंसेवी संस्था, पारधी फासेपारधी संघटना, संकल्प फाउंडेशन, न.प. म. फुले शाळा एनसीसी कॅडेट, ओमशिवकृपा संस्था, वादाफळे कृषी महाविद्यालय, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेव मेन सेव नेशन, निमा, निमा फार्माचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील वासनिक यांनी केले. डॉ. विजय अग्रवाल यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT