Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : जिल्ह्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीचा कहर

जिल्ह्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. प्रामुख्याने चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे उभी पिके उद्ध्वस्त झाल्याची गंभीर परिस्थिती आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीने (Heavy Rain Nashik) हाहाकार माजवला आहे. प्रामुख्याने चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात ढगफुटीसदृश (Rain Like Cloud Burst) झालेल्या पावसामुळे उभी पिके उद्ध्वस्त (Crop Damage) झाल्याची गंभीर परिस्थिती आहे. नांदगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडलांत तर येवला तालुक्यात एका मंडलात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. रविवारी (ता. १८) रोजी जिल्ह्यात चांदवड तालुक्याला पावसाने सर्वाधिक झोडपले. जिल्ह्यात एकूण १५ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाल्याने पूर्व भागात चालुवर्षी झालेला सर्वांत मोठा पाऊस मानला जात आहे.

चांदवड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन शिवारे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे उरलेली थोडीफार खरीप पिके हाती येण्याची आशाहीआता पूर्णपणे मावळली आहे. नांदगाव तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये तर येवला तालुक्यातील नगरसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. पश्चिम पट्ट्यातील पेठ तालुक्यात पेठ व जोगमोडी, दिंडोरी तालुक्यांतील ननाशी, तर सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणा व सुरगाणा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. पेठ व सुरगाणा तालुक्यांतील भात, नागली व वरई या पिकांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला.

इगतपुरी व त्रंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सध्या पावसाचा जोर कमी होऊन पूर्व भागात पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामध्ये चांदवड तालुका सर्वाधिक प्रभावित झाला आहे. या भागात प्रामुख्याने खरीप हंगामातील आगाप कांदा लागवडी मोठ्या प्रमाणात होत असतात; मात्र शेतकऱ्यांची तयार झालेली रोपे या पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत, तर सोयाबीन, मका, बाजरी तर काही प्रमाणात कापूस या पिकांमध्ये सतत पाणी साचून राहिल्याने आता पिके सडू लागल्याची स्थिती आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग घटविला

इगतपुरी व त्रंबकेश्वर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणातून होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आला. रविवारी (ता. १८) दारणा, गंगापूर, कडवा व पालखेड या धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू होता.

या महसूल मंडलांत अतिवृष्टी

नांदगाव ९८

मनमाड ९६

वेहेळगाव ६८

जातेगाव ८५

हिसवळ ९६

उंबरठाणा १०५.८

सुरगाणा १०५.८

ननाशी ७४

पेठ ६७.८

जोगमोडी ७०.५

नगरसूल ६७.५

चांदवड ११७.५

रायपूर १०७.३

दिघवद ११७.५

दुगाव १२६.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT