Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील ३९ मंडलांमध्ये अतिवृष्टी

Latest Rain Update : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला.

Team Agrowon

Latest Agriculture News : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नांदेड या ५ जिल्ह्यांतील ३९ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या २८ मंडलांपैकी ८ मंडलांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. धो -धो पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. ओढे, नाले, नद्यांना पूर आले. या पावसाचा खरिपातील वाळलेल्या पिकांना फायदा होणार नाही. परंतु रब्बीच्या पेरणीसाठी उपयोग होऊ शकेल.

अनेक दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ४८ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात सरासरी २२.३ मिलिमीटर, बीड जिल्ह्यात सरासरी ३२.८ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात सरासरी १४.५ मिलिमीटर, धाराशिव जिल्ह्यात सरासरी १६ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात सरासरी १०.४ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात सरासरी ७ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७.१ मिलिमीटर पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक होता. धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही मंडलांत चांगला पाऊस झाला. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पालम, हिंगोली जिल्ह्यांतील हिंगोली, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत चांगला पाऊस झाला.

तालुका निहाय सरासरी पाऊस

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर ३२.३, पैठण ३१,६, गंगापूर ६८.१, वैजापूर ७३.१, कन्नड ३८.७, खुलताबाद २७.४, सिल्लोड ६७.२, सोयगाव ३४.२, फुलंब्री ३२.४.

जालना ः जालना ८.६, भोकरदन ४२.७, जाफ्राबाद ३३.८, अंबड १०.८, परतुर १८.६, बदनापूर २१.२, घनसावंगी २८.५, मंठा ९.८. बीड ः बीड २८.१, पाटोदा ५२, आष्टी ५४.१, गेवराई २७.४, माजलगाव १.१, अंबाजोगाई ५२.६, केज ४५.५, परळी १४, धारुर २६.३, वडवणी १२.४, शिरुर कासार ४५.४.

लातूर ः लातूर १७.४, औसा १०.५, अहमदपूर २३.३, निलंगा ४, उदगीर २६.७, चाकूर १९.९, रेणापूर १७.४, देवणी २, शिरुर अनंतपाळ २.५, जारिकोट ७.७. धाराशिव ः धाराशिव १९.८, तुळजापूर १.९, परांडा ३४.४, भूम ३४.८, कळंब ११.६, उमरगा २, लोहारा ५.६, वाशी १९.१. नांदेड ः नांदेड ०.८, बिलोली ३.४, मुखेड १७.१, कंधार ११, लोहा १९.३, हदगाव ३.८, भोकर ५.८, देगलूर १७.२, किनवट ३२.२, मुदखेड ५.४, हिमायतनगर ९.४, माहूर ५.५, धर्माबाद १.६, उमरी ४.५, अर्धापूर २.८, नायगाव २.६.

परभणी ः परभणी २.५, गंगाखेड १०.५, पाथरी २.८, जिंतूर २.४, पूर्णा ८.१, पालम २५.३, सेलू ५.४, सोनपेठ ७.१, मानवत ०.३, हिंगोली ११.९, कळमनुरी ४.४, वसमत १, औंढा नागनाथ ०.८, सेनगाव १५.५.

अतिवृष्टीची मंडले (पाऊस मिलीमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ः उस्मानपुरा ६८, चिकलठाणा ६८.३, गंगापूर १०६.८, मांजरी ८७.८, भेंडाळा १०७.५, शेंदूरवादा ६८.५, सिद्धनाथ वडगाव ११५.५, जामगाव १०३.५, वैजापूर ६७.५, खंडाळा १०२.८, बोरसर १०२.८, लोणी ८१.८, लासुरगाव ६९, महालगाव ६७, नागमठाण ६९.३, लाडगाव ६८.५, गायगाव ६६, जानेफळ १६२, करंजखेडा १०९, सिल्लोड ६७.३, भराडी ६७.३, अजिंठा ७६.३, आमठाणा ६५.३, बोरगाव ८१.५, अंभई ७९, पालोद ७०.८, शिवना ६७, उंडणगाव ६९.३.

जालना जिल्हा ः राजुर ६६.५.

बीड जिल्हा ः थेरला ६६.३, आष्टी ६६, टाकळसिंगी ६५.३, चकलांबा ६८.२५, अंबाजोगाई ६८.२५, लोखंडी ६८.२५.

धाराशिव जिल्हा ः सोनारी ६९.

नांदेड जिल्हाः बोधडी ६७.७५, सिंदगी ७९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-Us Trade Deal : अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद आणि दादागिरी

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT