पुणे : गेल्या काही दिवसांच्या उघडिपीनंतर गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2022) आगमनापासून पावसाने जोर धरण्यास (Rain Intensity Increased) सुरूवात केली आहे. पुरंदर, बारामती, इंदापूर, आंबेगाव, हवेली तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy Rain With Lightning) झाला. त्यामुळे खरिपातील सोयाबीन (Soybean), मूग (Green Gram), उडीद (Urad) या पिकांसह भाजीपाला, फळभाज्यांचे, तर काही ठिकाणी पॉलिहाऊस, शेडनेट पडल्याने नुकसान (Crop Damage) झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पावसाने दमदार हजेरी लावली. एक ते दीड तास झालेल्या पावसाामुळे ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पुरंदरमधील राख, वाल्हे परिसरात ढगफुटीसद्श्य पाऊस झाल्याने परिसर पूर्ण जलमय झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. बुधवारी (ता.३१) दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून आले. साडे पाचच्या दरम्यान दमदार पाऊस झाला. रात्रीही दहाच्या दरम्यान पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस बरसला. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले बंधारे तुडूंब भरले आहेत.
इंदापुरातील कडबनवाडी परिसरातही तानाजी शिंगाडे यांच्या शेतात जोरदार वाऱ्यामुळे दहा ते बारा एकरावरील शेडनेट पडला. त्यामुळे ढोबळी मिरचीचे मोठे नुकसान झाले. गावातील इतर शेतकऱ्यांना फटका बसला. आंबेगावच्या पूर्व भागातही अवसरी, निरगुडसर, गावडेवाडी, जवळे, भराडी अशा अनेक गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली. काही प्रमाणात टोमॅटोसह इतर पिकांचेनुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.