Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : धरणक्षेत्रांत जोरदार पावसाची प्रतीक्षा

Team Agrowon

संदीप नवले ःअॅग्रोवन वृत्तसेवा
Monsoon Rain : पुणे : मॉन्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर राज्यातील सुर्याधामणी, वैतरणा, भातसा अशा काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. मात्र, अजूनही बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जून संपत आला तरी धरणांत पाण्याची आवक सुरू झाली नसल्याची स्थिती आहे.

यंदा जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होऊ लागली होती. राज्यात ऐन पावसाळ्यात सुमारे ३६ हून अधिक धरणे कोरडी पडल्याचे चित्र होते. राज्यात लहान, मध्यम व मोठे असे एकूण तब्बल २ हजार ९८९ प्रकल्प आहेत.

त्यांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४२२.१२ टीएमसी आहे. सध्या या धरणांत अवघा ३१६ टीएमसी म्हणजेच सरासरी २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

गुरूवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील ‘सुर्याधामणी’ धरण क्षेत्रात सर्वाधिक २४१ मिलिमीटर पाऊस झाला. तर भातसा धरणक्षेत्रात १३७ मिलिमीटर, वैतरणामध्ये १२२ मिलिमीटर पाऊस पडला.

पुणे विभागातील पवना ५५, कोयना ४९, राधानगरी ४०, धोंमबलकवडी धरणक्षेत्रात ४७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. डिंभे, खडकवासला, घोड, भाटघर, वारणा, कृष्णा, वीर, नीरा देवघर, आंध्रा, दूधगंगा आदी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे.

नाशिक विभागातील भंडारदरा ७९ तर दारणा धरणक्षेत्रात ६५ मिलिमीटर पाऊस पडला. तर गंगापूर, मुळा, गिरणा, हतनूर या धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

मराठवाड्यातील अनेक भागात हलका पाऊस पडत आहे. माजलगाव धरणक्षेत्रात २७ मिलिमीटर तर, जायकवाडी, निम्न दुधना, पूर्ण येलदरी, मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, तेरणा या धरणक्षेत्रात तुरळक पाऊस आहे. त्यामुळे ओढे, नाले अजूनही कोरडेठाक आहेत.


विदर्भातील इटियाडोह धरणक्षेत्रात बुधवारी सर्वाधिक १५८ मिलिमीटर, तर बाघ शिरपूर धरणक्षेत्रात १०० मिलिमीटर पाऊस पडला. याशिवाय पंचतोतलाडोह, गोसी खुर्द, इरई, पेनटाकळी, खडकपूर्णा या धरणक्षेत्रात हलक्या सरी कोसळल्या आहेत.

तर निम्न वर्धा, ऊर्ध्व वर्धा, बेंबळा, काटेपूर्ण, वान, अरुणावती या धरणक्षेत्रात पाऊस न पडल्याची नोंद झाली आहे.

...या धरणक्षेत्रात कमी पाऊस
- पुणे विभागातील डिंभे, खडकवासला, घोड, भाटघर, वारणा, कृष्णा, वीर, नीरा देवघर, आंध्रा, दूधगंगा, राधानगरी, उजनी


- नाशिक विभागातील गंगापूर, मुळा, गिरणा, हतनूर
- मराठवाड्यातील माजलगाव, जायकवाडी, निम्न दुधना, पूर्ण येलदरी, मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, तेरणा


- विदर्भातील पंचतोतलाडोह, गोसी खुर्द, इरई, पेनटाकळी, खडकपूर्णा


...या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस
- कोकणातील ‘सुर्याधामणी’, भातसा, वैतरणा
- पुणे विभागातील कोयना, राधानगरी


- नाशिक विभागातील भंडारदरा, दारणा
- विदर्भातील इटियाडोह, बाघ शिरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT