Heavy Rainfall
Heavy Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rainfall : अतिवृष्टीची मंडळे ६७ ने वाढली

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : काढणीला आलेल्या मराठवाड्यातील प्रमुख सोयाबीन पिकांसह (Soybean Crop) वेचणीला आलेल्या कपाशी पिकाची परतीच्या पावसाने वाताहत करणे सुरूच ठेवले आहे. १ जूनपासून आजपर्यंत (ता. १३) मराठवाड्यातील २७५ मंडळात अतिवृष्टी झाली. ऑगस्ट अखेर अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या २०८ इतकी होती. त्यामुळे आधीच्या नुकसानीचा (Crop Damage) क्षेत्रात वाढ होणार हे स्पष्ट आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४८ लाख ३० हजार ३८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९.४५ टक्के क्षेत्रावर झालेल्या या पेरणीपैकी २४ लाख ८७ हजार ४८८ हेक्टरवर अर्थात ५१.५० टक्के क्षेत्रावर सोयाबीन, १३ लाख ७१ हजार ४९३.७७ हेक्टर अर्थात २८.३९ टक्के क्षेत्रावर कपाशी तर ९ लाख ७१ हजार ४०३ हेक्टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २० टक्के क्षेत्रावर इतर पिके आहेत.

आतापर्यंत मराठवाड्यातील २७५ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीने जून ते ऑगस्ट दरम्यान १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरचे नुकसान केले. त्याची मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे सततच्या पावसानेही ६ लाख ९१ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरचे नुकसान झाले.

याविषयी मदतीचा निर्णय होणे बाकी आहे. याशिवाय गोगलगायीच्या आक्रमणाने १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांच्या ७२ हजार ४९१ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. त्याचीही मदत पोहोचविली गेली. जवळपास ९.९१ हेक्टर शेत जमीन अतिवृष्टी व पावसामुळे खरडली गेली.

आजवर झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ९९२१ कच्ची-पक्की घरे व गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. याशिवाय ११११ जनावरांचाही नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्राने दिली. पडणारा पाऊस भाग बदलून व कमी वेळात धो धो पडत असल्याची स्थिती आहे.

सध्या आमच्या शेतातील खरिपांच्या पिकांची काढणी सुरू असून सतत सुरू असलेल्या व जोरदार पडत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांची पूर्णपणे वाट लागली आहे. ओढ्याचे पाणी शेतात शिरल्याने शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सर्व नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तत्काळ मदत द्यावी.

वसंत जगदाळे, शेतकरी, साखरे बोरगाव, जि.. बीड

मागील आठ दिवसापासून सतत पाऊस होत असल्याने काढलेली व काढणी सुरू असलेली पिके भिजून जागेवर खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे शासनाने या वर्षी शेतकऱ्यांना अनुदान व विमा द्यावा.

- संदीपान मस्के, शेतकरी, नेकनूर जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT