Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : वारा, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस

वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे लोळ निर्माण झाले होते. दरम्यान या पावसामुळे आंबा आणि काजूचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Sindhudurg Weather Update : जिल्ह्याच्या काही भागांत शुक्रवारी (ता. ७) सायकांळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस (Heavy Rainfall) झाला. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे लोळ निर्माण झाले होते.

दरम्यान या पावसामुळे आंबा आणि काजूचे नुकसान (Mango Cashew Crop) होण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण होऊन वाऱ्याचा वेगदेखील वाढला होता.

जिल्ह्यात गेले दोन दिवस तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी तीनपासून वैभववाडी तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे लोट निर्माण झाले. कणकवली तालुक्यातदेखील तीच स्थिती होती.

विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यापाठोपाठ पावसाच्या सरीदेखील पडू लागल्या. वैभववाडी तालुक्यातील सडुरे, अरूळे, नावळे, खांबाळे, आर्चिणे, कुर्ली, करूळ, वैभववाडी या भागांत वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.

या भागात दहा ते पंधरा मिनिटे पाऊस पडत होता. कणकवली तालुक्यातील फोंडा, घोणसरी, हरकुळ, नाटळ, कनेडी, कणकवली या भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील काही गावांमध्ये अर्धा तास पाऊस सुरू होता. याशिवाय जिल्ह्याच्या सावंतवाडी, कुडाळ, देवगड या भागांत ढगाळ वातावरण होते.

परंतु सायकांळी उशिरापर्यंत पाऊस झाला नव्हता. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांतील आंबा पिकांवर पावसाचा मोठा परिणाम होणार आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी फळगळ होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण होऊन वाऱ्याचा वेगदेखील वाढला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers: मॉरिशसचे मृगजळ?

Banana Farming: खानदेशात दर्जेदार केळी आवकेत वाढ

Jaggery Export: युद्धामुळे गूळ निर्यात थांबली

Leopard Protection: बिबट्याला शेड्यूल-२ मध्ये टाकण्याचा निर्णय

Forest Food: कोल्हापुरात उद्यापासून कंदमुळांचे दोनदिवसीय प्रदर्शन

SCROLL FOR NEXT