Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात मुसळधारेचा इशारा

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात मुसळधार वादळी पावसाने (Heavy Rain with Wind) हजेरी लावली आहे. आज (ता. १३) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) हवामान विभागाने (weather Department) वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, उदयपूर, भोपाळ, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, बालासोर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून बांगलादेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रातील चक्राकार वारे या पोषक प्रणालींमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. आज (ता. १३) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

तीव्र कमी दाब क्षेत्र निवळतेय

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, आग्नेय मध्य प्रदेश आणि विदर्भात आल्यानंतर निवळले. सध्या या भागात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली हळूहळू विरून जाणार आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT