Rain Update In Maharashtra Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Latest Rain News : कोकण आणि घाटमाथ्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार पाऊस सुरूच आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळला.

Team Agrowon

Pune News : कोकण आणि घाटमाथ्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार पाऊस सुरूच आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाचा जोर होता. घाटमाथ्यावरील आंबोणे येथे सर्वाधिक २३० मिलिमीटर, ताम्हिणी येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकणासह राज्यात कमी अधिक प्रमाणात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक भागात पावसातील खंडामुळे खोळंबलेल्या पेरण्या सुरू होऊ लागल्या आहेत. धरणांच्या पाणलोटात मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

शनिवारी (ता. ८) रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटर) (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : दापोली १९०, माथेरान, मंडणगड प्रत्येकी १६०, हर्णे, राजापूर प्रत्येकी १४०, श्रीवर्धन, वाकवली, पेण प्रत्येकी १३०, सुधागड पाली १२०, पोलादपूर, अंबरनाथ, दोडामार्ग प्रत्येकी ११०, महाड, खेड, माणगाव, म्हसळा प्रत्येकी १००, संगमेश्वर, जव्हार, विक्रमगड, लांजा, तळा, कर्जत, कुडाळ, शहापूर, खालापूर, मुलदे, पनवेल, मुरबाड, वाडा, उल्हासनगर प्रत्येकी ८०.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर १४०, लोणावळा ११०, इगतपुरी १००, गगनबावडा ९०, शाहूवाडी, गिधाडे, पन्हाळा प्रत्येकी ५०, पाटण, सिंदखेडा, ओझरखेडा प्रत्येकी ४०, गारगोटी, आजरा, त्र्यंबकेश्वर, चंदगड, नवापूर, वेल्हे प्रत्येकी ३०.

मराठवाडा : बिलोली ५०, मुखेड, भोकर प्रत्येकी ३०.

विदर्भ : नरखेडा, पांढरीकवडा, कुही प्रत्येकी ५०, सिरोंचा, लाखणी, मारेगाव, आष्टी, गोरेगाव प्रत्येकी ४०, देसाईगंड, राळेगाव, वरूड, भंडारा, नागभीड, घाटंजी, साकोली. वरोरा, गोंदिया, ब्रह्मपुरी, भाम्रागड, कोर्ची, आर्णी, अहेरी, कुरखेडा, अर्जूनी मोरगाव, खारंघा प्रत्येकी ३०.

घाटमाथा : आंबोणे २३०, ताम्हिणी २१०, दावडी, शिरगाव १७०, डुंगरवाडी १५०, कोयना नवजा, भिरा प्रत्येकी १२०, लोणावळा १००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले

Cotton Disease : कपाशीवर वाढतोय टोबॅको स्ट्रीक विषाणूंचा प्रादुर्भाव

Wire Fencing Scheme: शेताला तार कुंपनासाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा शिवनेरीवर संकल्प; आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच

Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल

SCROLL FOR NEXT