Rain Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने जिल्ह्यातील पश्चिम भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.

Team Agrowon

Pune News : पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने जिल्ह्यातील पश्चिम भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. बुधवारी (ता.१९) सकाळपर्यंत वेल्ह्यात १६५.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर, पूर्व भागात हलक्या सरी पडल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जोरदार पाऊस न झाल्याने पूर्व भागातील शिरूर, खेड, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या भागात पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे या भागात अजूनही पेरण्या बाकी असून मोठ्या प्रमाणात पेरणी बाकी आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून भागात सर्वदूर तुरळक सरी पडत असल्याने पेरण्या होतील अशी शक्यता शेतकऱ्यांना आहे.

मावळमधील लोणावळा येथे १६० मिलिमीटर पाऊस पडला, तर कार्ला ११४.३, खडकाळा ४९, शिवणे २७ वडगाव मावळ ३०.३, काले ३३ मिलिमीटर तर तळेगावमध्ये हलका पाऊस पडला. वेल्ह्यातील पानशेत ५९.५, विंझर, ३८.३ मिलिमीटर, तर आंबवणे येथे मध्यम पाऊस पडला.

मुळशीतील माले ८०.८, मुठे ६५.३ मिलिमीटर, तर पौड, घोटावडे, थेरगाव, पिरंगुट भागात हलका ते मध्यम पाऊस बरसला. भोरमधील निगुडघर ५७.३, भोर ३१.५, भोलावडे ३९.३, आंबवडे ३०.८ मिलिमीटर, तर नसरापूर, किकवी, वेळू, संगमनेर संततधार सुरू होती. जुन्नरमधील राजूर आणि आपटाळे येथे ४४.३ मिलिमीटर, तर नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, डिंगोरे, ओतूर येथे तुरळक पाऊस पडला.

आंबेगाव येथे ६५ मिलिमीटर पाऊस पडला असून घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली, तर खेडमधील वाडा, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस हलका पाऊस पडला. शिरूर येथे २६ मिलिमीटर पाऊस पडला.

तर टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी येथे हलका पाऊस पडला. इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर येथे हलका पाऊस पडला. दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजूरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा भागांत हलका पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT