Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार सुरूच

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून शुक्रवार (ता. ७) पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून शुक्रवार (ता. ७) पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (ता. ६) झालेल्या वादळी पावसात १३ हून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले.

काही गावांमध्ये फळझाडे मोडून पडली. वादळाने महावितरणचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतदेखील वाढ होत आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. सायकांळी जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. देवगड, खारेपाटण, तळेरे, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ, मालवणच्या काही भागांना मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.

यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेक झाडे उन्मळून आणि मोडून पडली. यातील काही झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्याने वीज खांब वाकणे, वीज वाहिन्या तुटून वीजप्रवाह खंडित होणे, असे प्रकार झाले. खारेपाटण येथे मुख्य वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. त्यामुळे खारेपाटण आणि वैभववाडीतील वीजपुरवठा खंडित होता.

वादळाने सौंदाळे ताह्मणकरवाडी (ता. देवगड) येथील एका शेतकऱ्याची आंब्याची झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात १३ हून अधिक घरे, गोठे आदी मालमतांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान झाले. कुडाळ येथील वालावल-कवठी मार्गावर झाड कोसळले.

सावंतवाडीतील देवसुत शाळेच्या शेडवर झाड कोसळले. सोनाळी वाणीवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेची विहीर कोसळली. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

शेतीच्या कामांना गती

जिल्ह्यात यावर्षी मॉन्सूनचे आगमन झाल्यामुळे शेतीची कामे रखडली होती. परंतु आता सुरुवातीला तयार केलेल्या भात रोपवाटिकांतील भातरोप पुनर्लागवडीला सुरुवात झाली आहे. लागवडयोग्य पाऊस पडत असल्यामुळे शेतशिवारे गजबजली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT