Kolhapur Rain agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain : पावसाने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली, अनेक राज्य आणि जिल्हा मार्ग बंद

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ४ दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ४ दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली आहे. दरम्यान कालपासून थोडी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी आज (ता.२५) सकाळी १० पर्यंत ४० फूट ५ इंचांवर होती. दरम्यान मागच्या ८ तासांत फक्त एक इंचाने पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

घाट माथ्यावर होत असलेल्या पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. दरम्यान कालपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर असली तरी कोल्हापूर जिल्ह्याला अद्यापही पूढचे २४ तास महत्वाचे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उद्या २६ जुलै पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे धरण असलेले राधानगरी धरण जवळपास ९५ टक्के भरले आहे. पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास धरण १०० टक्के भरून स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी पाठोपाठ कासारी व कुंभी धरण ८० टक्के भरले आहे.

सद्या पंचगंगेत ६० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. जर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला तर पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

राधानगरी धरण रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ८१.०७ टक्के भरले. ८.३६ टीएमसी क्षमतेच्या या धरणात ६.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवसापर्यंत धरण ७५ टक्के भरले होते, त्यावेळी धरणात ६.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा टक्के जादा पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांत १६४.५ मि.मी. पाऊस

मागच्या पाच दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. मागच्या ६ दिवसांत जिल्ह्यात जवळपास १६४.५ मि.मी. पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून ते २३ जुलैपर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत केवळ ५७ टक्केच पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख १५ धरणे २३ जुलैपर्यंत सरासरी ६१.७४ टक्के भरली आहेत. या धरणांत एकूण ९१.७६ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्या तुलनेत यावर्षी आजअखेर या सर्व धरणांत एकूण ५६.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: ३.२५ लाख शेतकऱ्यांची कपास किसान अॅपवर नोंदणी; १५ ऑक्टोबर पासून कापसाची हमीभावावर खरेदी सुरु होणार

Peek Pahani: ई-पीक पाहणी केली नसेल तर एक आहे पर्याय, जाणून घ्या सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीविषयी...

Crop Insurance Delay : विमा कंपनी, कृषिमंत्र्यांना हटवा

Soybean Crop Damage : सिन्नर तालुक्यात सोयाबीनला सर्वाधिक फटका

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीतील १.९८ कोटी शासनाकडून वसूल

SCROLL FOR NEXT