Pune Rain Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी

शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत सोमवारी (ता. २९) सायंकाळी पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Rain Update : पुणे : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत सोमवारी (ता. २९) सायंकाळी पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. यात काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. हा पाऊस नुकसानकारक असला, तरी खरिपासाठी योग्य असल्याची चर्चा शेतकरी वर्गामध्ये सुरू झाली आहे.

सोमवारी (ता. २९) जिल्ह्यात खेड, आंबेगाव तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंब्याला फटका बसणार असून, टोमॅटो आणि अन्य पिकांनाही फटका बसणार आहे. अनेक जणांच्या शेतात कांदा काढून ठेवला असून, तो सडण्याची शक्यता आहे.


आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली; पण मागील काही उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, टाव्हरेवाडी, लोणी, पहाडदारा, निरगुडसर, पारगाव, शिंगवे, लाखनगाव, देवगाव, धामणी, जाकरवाडी, शिरदाळे, काठापूर व पोंदेवाडी आदी गावांमध्ये जोरदार वारे वाहत होते. नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी गारपीटही झाली.

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या व काढणीस आलेल्या बाजरीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली. या पावसामुळे तरकारी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसह कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे..

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT