Vineyard Damage
Vineyard Damage Agrowon
ताज्या बातम्या

vineyard Damage : पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान

टीम ॲग्रोवन

वालचंदनगर, जि. पुणे ः इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे (Grape Farmer) अतोनात नुकसान (Vineyard Damage) झाले असून शेतकरी अडचणीमध्ये आला आहे. पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे ६ हजार २०० एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यातील बहुतांश क्षेत्र तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, लासुर्णे, शेळगाव, बिरगुंडी, कळस परिसरामध्ये आहेत. चालू वर्षी सलग पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला.१० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये सुमारे २०० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. अतिपावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

तसेच जास्त पाणी झाल्यामुळे द्राक्षांच्या जमिनीखालील मुळांनी (पांढ्या मुळ्या) कार्य करणे कमी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुळ्यांची जमिनीमधील वाढ खुंटली असून, वरच्या बाजूला मुळ्या फुटू लागल्या आहेत. तसेच छाटणी केलेल्या अनेक बागांमधील डावणी, कूज व द्राक्ष घड गळ सुरू आहेत.

अनेक शेतकऱ्यांचे छोटे द्राक्ष घड जाग्यावरतीच जिरले आहेत. पश्‍चिम भागामध्ये झालेल्या अतिपावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तातडीने पंचानामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रगतशील व कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी मोहन दुधाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केले आहे.

द्राक्ष बागांच्या छाटण्या रखडल्या...

अतिपावसामुळे तसेच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांच्या छाटण्या रखडल्या आहेत. भरणेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी तानाजी भगवान खराडे यांनी सांगितले, की ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आम्ही द्राक्ष बागेची छाटणी करत असतो. मात्र पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये पाणी साचले असून ऑक्टोबर महिना संपत आला तरीही पावसामळे छाटणीचा रखडली असल्याचे सांगितले.

फवारणी करण्यास अडचणी...

पावसामुळे सध्या अनेक द्राक्ष बागांमध्ये चिखल झाला आहे. याचा परिणाम कीटकनाशक फवारणीवरती होवू लागला आहे. कीटकनाशके फवारणीचे ट्रॅक्टर चिखलामध्ये फसत आहेत. यासंदर्भात शेळगावमधील शेतकरी मोहन दुधाळ यांनी सांगितले की, छाटणी केलेल्या बागांमध्ये डावणी, घडाची गळ, घड जिरण्याचे व कुजव्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांची कीटकनाशक फवारणी करून द्राक्षा बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र चिखलामध्ये ट्रॅक्टर फसत असून, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT