Jowar Harvesing Agrowon
ताज्या बातम्या

Jowar Harvesting : रब्बी ज्वारीची काढणी, मळणी सुरू

रब्बी हंगामातील ज्वारीची जवळपास २५ ते ३० टक्के क्षेत्रावरील पिकांची काढणी व मळणीची कामे सुरू आहेत.

Team Agrowon

Rabi Season छत्रपती संभाजीनगर : रब्बी हंगामातील ज्वारीची (Rabi Jowar) जवळपास २५ ते ३० टक्के क्षेत्रावरील पिकांची काढणी (Jowar Harvesting) व मळणीची कामे सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील रब्बी ज्वारी पिकाखालील (Jowar Crop) सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २ हजार १३८ हेक्टर होते.

प्रत्यक्षात २ लाख ४४ हजार ५९९ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले रब्बी ज्वारीचे पीक जवळपास पक्व झालेल्या अवस्थेत आहे.

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ५ हजार २१२ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १३० टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती.

काही ठिकाणी गहू पिकाची काढणी सुरू झाली असून पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. छत्रपती संभाजीनगर व जालना ही दोन जिल्हे मकाचे हब मानले जातात. या दोन जिल्ह्यांसह बीड मिळून तीन जिल्ह्यात रब्बी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार २४७ हेक्टर इतके आहे.

प्रत्यक्षात तीनही जिल्ह्यात ६२ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रावर रब्बी मकाची पेरणी झाली होती. काही ठिकाणी कनसातील दाणे भरण्याच्या अवस्थेत व काही ठिकाणी पक्व होण्याच्या अवस्थेत मका पीक आहे. जवळपास दहा ते पंधरा टक्के क्षेत्रावरील मका पिकाची काढणी सुरू झाली आहे.

तीन जिल्ह्यात १३९ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी...

हरभऱ्याचे तीनही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ लाख ३० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या १३९ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली होती. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ७० ते ८० टक्के पिकाची काढणी व मळणीची कामे सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT