Jowar Cultivation : ज्वारीच्या २५ हजार जननद्रव्यांची लागवड

Team Agrowon

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे वाशीम येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस सोमवारी (ता. १३) आयोजित करण्यात आला होता.

Jowar Cultivation | Agrowon

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १६ एकर शेतामध्ये जननद्रव्यांची संवर्धित प्रणाली (Augmented design) मध्ये लागवड करण्यात आली आहे.

Jowar Cultivation | Agrowon

यातील बरीच जननद्रव्ये ही अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहेत. त्यासाठी एकंदरीत पूर्ण परिसरात नऊ विभाग करण्यात आले.

Jowar Cultivation | Agrowon

ज्वारीचे सध्याचे सहा वैशिष्ट्यपूर्ण वाण हे नियंत्रक वाण म्हणून वापरण्यात आले आहेत.

Jowar Cultivation | Agrowon

ज्वारी जननद्रव्ये तपासणी कार्यक्रम राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्युरो (NBPGR) नवी दिल्ली यांनी पुरस्कृत केला आहे.

Jowar Cultivation | Agrowon

भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैदराबाद व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्याची अंमलबजावणी केली.

Jowar Cultivation | Agrowon

शास्त्रज्ञांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ज्वारीच्या २५ हजार जननद्रव्यांची लागवड केली आहे. या जननद्रव्यांचा अभ्यास केला जाणार आहे.

Jowar Cultivation | Agrowon
Animal Care | Agrowon