Hapus Mango Market Agrowon
ताज्या बातम्या

Hapus Mango market : रत्नागिरीत कर्नाटकी आंबा विक्रेत्यांना बागायतदारांची तंबी

Mango Season : कर्नाटकमधील आंबा हापूसच्या नावाखाली विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक आंबा बागायतदारांनी गुरुवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी मोहीम राबविली.

Team Agrowon

Ratnagiri News : कर्नाटकमधील आंबा हापूसच्या नावाखाली विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक आंबा बागायतदारांनी गुरुवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी मोहीम राबविली. बागायतदारांनी रेल्वे स्थानकावरील स्टॉलधारकांशी संवाद साधला. कर्नाटकी आंबा विकायचा असेल तर ग्राहकाला समजेल अशी पाटी लावा, अशी तंबी दिली.

आंबा उत्पादन कमी असल्याने विक्रेते कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकत असल्याचे पुढे आले होते. या विरोधात बागायतदारांनी मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावर धडकलेल्या बागायतदारांना स्थानिक शेतकऱ्यांकडून रत्नागिरी हापूस लिहिलेल्या बॉक्समधून कर्नाटकी आंबा दिल्याची माहिती समजली.

स्थानकावरील स्टॉलधारकाकडे सुमारे ६० बॉक्स होते. त्या विक्रेत्याकडून बागायतदारांनी माहिती घेतली. बागायतदार निशांत सावंत, प्रशांत सावंत, पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बावा साळवी, धनराज सावंत, श्रेयस सावंत, मंगेश साळवी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर गुरुवारी फक्त दोनच विक्रेते होते.

एकाकडे कर्नाटकी आंबा होता. त्या विक्रेत्याने तशी पाटीही लावलेली नव्हती. याबाबत नाराजी बागायतदारांनी व्यक्त केली तसेच कर्नाटकी आंबा विकायचा असेल तर तसा फलक लावा, अशी तंबी दिली. त्या विक्रेत्याने कर्नाटकी आंबा विकणार नाही, अशी ग्वाही बागायतदारांना दिली. आंब्याचे बॉक्स देणाऱ्याकडूनच आपली फसवणूक झाल्याचेही त्या विक्रेत्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT