Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

Dryland Agriculture : कोरडवाहू शेतीमध्ये आपत्कालीन पीक नियोजनाबद्दल मार्गदर्शन

Agriculture News : कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातर्फे आळंदा व काजळेश्‍वर (ता. बार्शीटाकळी) येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचा मेळावा मंगळवारी (ता. ४) झाला.

कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यक्रमामध्ये कोरडवाहू शेतकरी संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिता चोरे, कृषी विद्यावेत्ता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. गणवीर, सरपंच पुंडलिक चव्हाण, उपसरंपच निखील इंगळे व शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आळंदा व काजळेश्‍वर येथील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीमध्ये आपत्कालीन पीक नियोजनाबद्दल शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. सध्याची परिस्थिती पाहता पश्‍चिम विदर्भामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेरणी झालेली नाही.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुरेसा पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता संयमाने या परिस्थितीस सामोरे जाण्याचे आवाहन डॉ. चोरे यांनी केले. हवामानाचा अचूक अंदाज घेऊन परिपक्व होणाऱ्या कपाशी व सोयाबीन वाणांची निवड करून कोरडवाहू शेतीमध्ये नियोजन करावे, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. गणवीर यांनी कपाशी व सोयाबीन या प्रमुख पिकांमधील आंतरपीक पद्धती व या प्रमुख पिकांचे कोरडवाहू शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करण्यासाठी जैविक बीजप्रक्रिया द्रावण वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन रविकिरण माळी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT