Grape Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Grape Crop Damage : लेकरासारखं सांभाळलेल्या द्राक्षाचा अवकाळीने घात

निफाड तालुक्यात काढणीयोग्य बागांचे अतोनात नुकसान

Team Agrowon

चांदोरी, ता. निफाड : आभाळ फाटलं, काळीज तुटलं, हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं अन् अवकाळी पावसाने सारं हिरावलं, अशी विदारक स्थिती रविवारी (ता.९) चांदोरीत पाहायला मिळाली. लेकरासारखं सांभाळलेल्या बागांचा रविवारी झालेल्या अवकाळीने (Unseasonal rain) घात केला आहे.

वादळी वाऱ्यात ३० एकरांवर द्राक्षबागा (Graoe crop) भुईसपाट झाल्या आहेत. तर १०० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या दीड महिन्यात तीनदा अवकाळीने चांदोरीसह परिसराला दणका दिला आहे. फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यात अनेक द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. वारंवार अवकाळीने शेतकऱ्याला उध्वस्त केले आहे.

निफाड तालुक्यातील चांदोरी, खेरवाडी, चितेगाव, सुकेणे परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका बसला. या पावसाचा फटका गहू, कांद्याला देखील बसला आहे. चांदोरीतील संजय कोरडे या शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग जोपासली होती.

मात्र ही बाग आडवी झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे अन यंदा पावसामुळे बाग वाया गेली. यामध्ये सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कोरडे यांनी सांगितले.

त्यांच्यासह बाळासाहेब आहेर, संजय कोरडे, भाऊसाहेब खर्डे, प्रवीण कोरडे, विष्णू गायखे, सोमनाथ लोंढे, सुरेश गडाख आदींच्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. इतर शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेतील मण्यांना तडे गेले आहेत.

बागा उतरतानाच पावसाचे थैमान
चार दिवसांपासून पुन्हा द्राक्ष काढणीला सुरुवात झाली आणि पुन्हा अस्मानी संकटाने दणका दिला. चांदोरीमध्ये द्राक्षाच्या बागा उतरण्याचे काम सुरु आहे. नेमक्या याचवेळी पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


प्रतिक्रिया ः
पावसाने द्राक्षशेती उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन-तीन वर्षांत ५० टक्के द्राक्ष बागा शेतकरी काढून टाकतील. द्राक्षशेती वाचवायची असेल, तर शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत. तत्काळ मदत द्यावी. अन्यथा भविष्यात द्राक्षशेती मातीमोल होईल.
- बाळासाहेब आहेर, नुकसानग्रस्त शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार

Rabi Intercropping: रब्बीत कोरडवाहू क्षेत्रात आंतरपिकाचे पर्याय कोणते? अधिक उत्पादनासाठी आंतरपीक गरजेचे

Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको

SCROLL FOR NEXT