Ajit Pawar News Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar Latest News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

Agriculture News : सध्याचे सरकार हे फोडाफोडीचे राजकारण करीत असून राज्यात व देशात जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. फोडाफोडीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही.

Team Agrowon

Nashik News : सध्याचे सरकार हे फोडाफोडीचे राजकारण करीत असून राज्यात व देशात जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. फोडाफोडीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही. आदिवासींच्या अनेक योजना बंद केल्या आहेत.

शिवसेनेशी गद्दारी करून हे सरकार स्थापन झाले आहे. ‘पन्नास खोके एकदम ओके’ असे आता बारकी पोरेही बोलू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, या शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.

हतगड (ता. सुरगाणा) येथे रविवारी (ता. ४) झालेल्या शेतकरी व कृतज्ञता मेळाव्यात पवार बोलत होते. या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिक कोकाटे, दिलीप बनकर, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, अशोक सावंत, कौतिक पगार, प्रेरणा बलकवडे, निवृत्ती अरिंगळे, तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, तालुकाध्यक्ष सखाराम भोये, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, राजेंद्र गावित, गोपाळ धूम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरुषोत्तम कडलग राजू पवार, आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की सुरगाणा तालुक्यातील पर्यटन, रोजगार, शेती सिंचन, आरोग्य, वन जमीन, वीज, रस्ते, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्यात मोर्चे, आंदोलन हेच वर्षानुवर्षे

सुरू आहे, नुसतेच मोर्चा काढून प्रश्न सुटत नसतात. जे मोर्चात पायी चालतात, त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. काही जण मोर्चे काढून सरकारला वेठीस धरून आपले स्वतःचे प्रश्न मार्गी लावत असतात हे आदिवासी बांधवांनी आता हुशारीने ओळखले पाहिजे.

कळवण विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या योजनांसाठी सर्वस्व पणाला लावू. जनतेने महाविकास आघाडीच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन पवार यांनी केले. महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केली जात आहेत हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. बेरोजगारी हटवा, कामे करा, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. वेळ मारून नेणारे नाहीत, असेही ते म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याची मदत अद्याप दिली नाही. अडचणीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात नाही. कांद्याला अनुदान जाहीर केले मात्र अद्याप तरी पदरात पडले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे हा प्रश्न भेडसावत आहे, असे अजित पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT