Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : हवालदिल शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे नुकसान (Farmer's Loss) झाले. शेकडो हेक्टरवरील शेतजमीन खरडून (Agriculture Land Wash Away) गेली व पिके सडली (Crop Damage). निसर्गाच्या कोपामुळे (Natural Calamity) दुष्टचक्रात सापडेल्‍या शेतकऱ्यांना निदान रब्बी हंगामापूर्वी आर्थिक मदत शासनाने द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी वंचितचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी शुक्रवारी (ता. २) मांडला. त्याला सभागृहात मंजुरीसुद्धा मिळाली.

जिल्हा परिषदेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. सभेत वंचितचे गटनेते सुलताने यांनी पुढील वर्षीपासून शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंका सिबील स्कोर तपासणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ९५ टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहतील. सिबील स्कोरसंबंधी अटींचे बॅंकांनी १५ जुलै रोजी पत्र काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणार नसल्याचे सुलताने यांनी सांगितले. सदर आदेश बॅंकांनी मागे घेण्याचा ठराव सभेत मांडला. त्या ठरावाला सभेत मंजुरी देण्यात आली.

सभेला अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती पंजाबराव वडाळ, सम्राट डोंगरदिवे, स्फूर्ती गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शिवसेनेचे डॉ. प्रशांत अढाव, गोपाल दातकर, गजानन पुंडकर, भाजपचे रायसिंग राठोड, कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर यांच्यासह इतर सदस्य, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT