Nana Patole Agrowon
ताज्या बातम्या

Nana Patole : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत सरकार असंवेदनशील

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने पुरता खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकार फारसे इच्छुक नाही. अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि परतीच्या पावसाने शेतीपिके (Crop Damage) वाया गेली आहेत हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती, परंतु शिंदे- फडणवीस सरकार (Shinde -Phadnvis Government) असंवेदनशील असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

कृषिमंत्री बेजबाबदार राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही हे कृषिमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील आहे. मराठवाड्यातील शेताच्या बांधावर कृषिमंत्री गेले तर ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे का नाही हे त्यांना कळेल. शेतजमीन दिसत नाही, बघावे तिथपर्यंत पाणीच पाणी साचले आहे.

शेतात तळी निर्माण झाली आहेत, पिकांचे नुकसान तर प्रचंड झालेले आहे, असे असतानाही कृषिमंत्री जे विधान करतात यावरून त्यांना शेती, शेतकरी व शेतीसंदर्भात काहीही माहिती नाही असा कृषिमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपले दुर्भाग्यच आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’चा बॉयलर अग्निप्रदीपन

Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

SCROLL FOR NEXT