Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ‘पीकविम्याऐवजी एकरी २० हजारांची मदत द्या’

Crop Insurance Nagar : शेतकऱ्यांना पीकविमा भरताना पूर्वी तीन कंपन्या होत्या. आता २५ खासगी कंपन्या पुढे आणल्या आहेत.

Team Agrowon

Nagar News : शेतकऱ्यांना पीकविमा भरताना पूर्वी तीन कंपन्या होत्या. आता २५ खासगी कंपन्या पुढे आणल्या आहेत. एक रुपयांत पीकविमा म्हणजे शासनाच्या तिजोरीतील मोठी रक्कम वीमा कंपन्यांना जाईल.

पीकविमा म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा देण्याऐवजी शेतकऱ्यांना सरसकट एकरी २० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

औताडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जून २०२३ पासून याबाबत अंमलबजावणीही सुरू झाली आहे. परंतु, २०१५ नंतर केंद्राने शासनाच्या मालकीच्या तीन कंपन्या असताना देशात जवळपास २५ खासगी कंपन्यांना मान्यता दिली. प्रत्येक राज्यात व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्यांना काम देऊन त्यांच्या नेमणुका केल्या.

शासन ठरवेल त्याच कंपनीला विमा भरण्याच्या सक्तीमुळे मागील सुमारे सात वर्षांपासून शासनाने नेमलेल्या खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांसह राज्य व केंद्र शासनाने भरलेल्या १८ टक्के रकमेचीही फसवणूक झाली आहे. याबाबत या कंपन्यांवर राज्य शासन अथवा केंद्र शासन यांपैकी कुणीही कारवाई केलेली नाही.

बहुतांश शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन न्याय मिळविला आहे. शासन फक्त तिजोरीतून विमा कंपन्यांना कोट्यवधी रुपये देत आहे. केंद्र व राज्य शासनाचा उद्देश हा विमा कंपन्या मोठ्या करण्याचा आहे का, असा प्रश्न पडतो, असे औताडे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT