Ganpatrao Deshmukh  Agrowon
ताज्या बातम्या

Ganpatrao Deshmukh : सांगोल्याच्या सूत गिरणीला गणपतराव देशमुखांचे नाव

सांगोला शेतकरी सहकारी सूत गिरणीला शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला वस्त्रोद्योग आयुक्त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे.

Team Agrowon

Sangola Yarn Mill सोलापूर ः सांगोला शेतकरी सहकारी सूत गिरणीला शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख (ganpatrao Deshmukh) यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला वस्त्रोद्योग आयुक्त (Textile Commissioner) पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही गिरणी आता डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोले या नावाने ओळखले जाईल.

या सूतगिरणीची उभारणी स्वतः माजी आमदार देशमुख यांनी १९८० मध्ये केली. अत्यंत काटकसर आणि योग्य व्यवस्थापनाने त्यांनी सूतगिरणीचा कारभार चालवला. आशिया खंडात सर्वोत्तम सूतगिरणी म्हणूनही गिरणीचा लौकिक राहिला आहे.

देशमुख यांच्या निधनानंतर या गिरणीला त्यांचे नाव द्यावे, असा ठराव २२ सप्टेंबर २०२२ मध्ये गिरणीच्या वार्षिक सभेत करण्यात आला होता. तो त्या वेळी एकमताने मंजूर करुन वस्त्रोद्योग विभागाकडे पाठवण्यात आला होता.

त्याला आता मंजुरी मिळाली आहे. राज्यातील सहकारी सूतगिरण्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. अनेक गिरण्यातील उत्पादन बंद झाले आहे, अशा स्थितीत सांगोल्याच्या या सूतगिरणीत नियमित उत्पादित तर होतेच, पण उत्पादित सूत निर्यातही होते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत ३.५५ लाख शेतकरी

Sugarcane Workers Safety: ऊस तोडणी कामगारांबाबत हलगर्जीपणा केल्यास कारवाई

Cow Slaughter Ban Law: गोपालक शेतकरी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या; अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा

Flowers Farmer Struggles: शेवंती उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

National Cooperative Sugar Mill Awards: दत्त शिरोळ, क्रांती अग्रणी कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT