Grape
Grape  Agrowon
ताज्या बातम्या

Grape : द्राक्ष बागायतदारांना फसवणाऱ्यांना बसणार चाप

टीम ॲग्रोवन

नाशिक : द्राक्षमाल व्यवहार (Grape Market) करणारे व्यापारी व शेतकरी यांच्यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजेत. दरवर्षी होणाऱ्या फसवणुकीच्या (Fraud To Grape Farmer) प्रकाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाईल तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी कठोर पाऊले उचलली जातील, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी स्पष्ट केले.

निफाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आयोजित पोलिस प्रशासन, द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समिती प्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, संघाचे नाशिक विभागीय संचालक ॲड. रामनाथ शिंदे, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे, लासलगाव बाजार समितीचे सह सचिव प्रकाश कुमावत, पत्रकार शेखर देसाई, उमेश पारिख आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी देशांतर्गत व देशाबाहेरील द्राक्षमाल व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीबाबत मत मांडले. पोलिस प्रशासनाकडून द्राक्ष बागायतदारांचे प्रबोधन व्हावे, व्यापारी वर्गाची माहिती, खरेदीकामी कार्यरत पायलट, सर्व्हिस प्रोव्हाईडर यांची माहिती नोंदविण्याची मागणी केली. द्राक्ष बागायतदारांचे माल व्यवहार हे कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी सौदा पावतीचा मसुदादेखील मांडण्यात आला.

शेतकरी प्रबोधन मेळावा घेण्याचा निर्णय

द्राक्ष बागायतदारांची द्राक्षमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यापारी निर्यातदार यांच्याकडून फसवणूक होते. त्याबाबत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याबाबत निवेदन दिले. त्यास प्रतिसाद म्हणून बागायतदार संघ, बाजार समिती पोलिस प्रशासन व शेतकरी यांचा संयुक्त प्रबोधन मेळावा जानेवारी महिन्यात घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. महामेळावा घेऊन त्याबाबत जागृती केली जाईल, असेही शेखर यांनी स्पष्ट केल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT