Rabi Irrigation
Rabi Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Irrigation : निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीसाठी चार आवर्तने

टीम ॲग्रोवन

परभणी : ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पामध्ये (Nimn Dudhana Project) या वर्षी १०० टक्के पाणीसाठा (Water Storage) उपलब्ध आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांसाठी डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे ४ पाणी आवर्तने देण्याचे नियोजन आहे. गुरुवार (ता. १७)पासून पहिले आवर्तन सुरू झाले आहे.

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज नमुना-७अ मध्ये पीकक्षेत्र नोंदवून परिपूर्ण अर्ज तत्काळ कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग १० अंतर्गत संबंधित उपविभागात सादर करावेत, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

पाणी अर्ज संबंधित उपविभागात विनामूल्य उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नमुना ७ अप्राप्त झालेल्या पाणी अर्जास नियमाच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येईल. तत्कालीन परिस्थितीनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार कार्यकारी अभियंता यांना असतील. पहिले आवर्तन गुरुवार (ता. १७) ते बुधवार (ता. ३०) या कालावधीत, दुसरे आवर्तन ता. १५ ते २८ डिसेंबर, तिसरे आवर्तन पाणीपाळी ता. १२ ते २५ जानेवारी २०२३ आणि चौथे आवर्तन ता. ९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

शेतकरी लाभधारकांना चालू हंगामातील कालव्याचे पाणी घेतल्यास पिकांची पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांसाठी पाणी मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी कालवा, नदी, नाले पाणी अर्ज मंजूर करून घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

जलाशय उपसा मंजूर उपसा सिंचन योजनांमधूनच करावा. रात्री किंवा दिवसा पाणी वाया घातल्यास वाया गेलेल्या पाण्याची वसुली संबंधित लाभधारकांकडून करण्यात येईल. जबरदस्तीने अथवा विनापरवानगीने गेट उघडल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अग्रिम पाणी पट्टी भरणे बंधनकारक राहील. विहिरीद्वारे भिजणाऱ्या सर्व प्रकारच्या पिकांवरील शासनाकडून आकारण्यात येणारी सिंचन पाणीपट्टी रद्द करण्यात आलेली आहे. नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

SCROLL FOR NEXT