ताज्या बातम्या

Weather Update : राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच राहणार

अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे झालेले ढगाळ हवामान, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव यामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे झालेले ढगाळ हवामान (Cloudy Weather), उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा (Clod Wind) अभाव यामुळे राज्यात गारठा (Cold Weather) कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा (Heat) चटका वाढून कमाल तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्याकडे येत आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान झाल्याने या भागात उकाडा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा भाग वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे.

उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. राजस्थानमधील चूरू येथे शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पारा १४ ते २३ अंशांदरम्यान

उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान ३० ते ३४ अंशांदरम्यान आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही भागात पहाटे गारठा कायम आहे. उर्वरित राज्यात आज (ता. २७) राज्यात कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये).

पुणे ३२.६ (१४.४), नगर - (१९.१), जळगाव ३०.९ (१४.५), धुळे ३०.० (१०.५), कोल्हापूर ३२.० (२१.७), महाबळेश्वर २६.०(१६.६), नाशिक ३०.० (१४.४), निफाड ३०.६ (१२.८), सांगली ३२.३(२१.०), सातारा २८.१(२१.५), सोलापूर ३२.४ (२०.०), सांताक्रूझ ३४.१(२३.०), डहाणू ३०.२ (२१.२), रत्नागिरी ३१.३ (२४.६), औरंगाबाद ३०.२ (१३.८), नांदेड ३१.४ (१७.०), उस्मानाबाद ३०.५ (१९.९), परभणी ३०.४ (१५.५), अकोला ३१.८ (१४.८), अमरावती ३०.८ (१३.५), बुलडाणा २९.७ (१४.५), ब्रह्मपुरी ३२.० (१३.१), चंद्रपूर २९.२ (१४.८), गडचिरोली ३०.०(१२.८), गोंदिया २८.५(१०.०), नागपूर ३०.० (११.७), वर्धा ३०.०(१३.४), वाशीम ३०.६ (१३.८), यवतमाळ ३१.० (१२.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT