गुवाहाटी (वृत्तसंस्था) : आसाममध्ये (Assam Flood) बहुतांश भागात बुधवारी (ता. २९) पूरस्थिती कायम असून गेल्या चोवीस तासात आणखी पाच जणांचा मृत्यू (Five Killed In Assam Flood) झाला. राज्यात आतापर्यंत २८ जिल्ह्यांतील २४.९२ लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. विशेषत: कछारच्या सिल्चर शहरातील बहुतांश भागात दहा दिवसांपेक्षा अधिक काळापासून पाणी साचलेले आहे. (Latest Assam Flood Update)
गेल्या चोवीस तासात कछारमध्ये तीन आणि मोरीगाव व धुबरी येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानुसार राज्यात यावर्षी पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १३९ वर पोहोचली आहे. हवामान खात्याने कोक्राझार, चिरांग, बक्सा येथे रेड ॲलर्ट जारी केला आहे तर धुब्री, बारपेटा, बोंगाईगाँव, उडलगुरी, बिस्वनाथ, लखिमपुरी, धेमजी आणि दिब्रुगड येथे ‘ऑरेंज ॲलर्ट’ दिला आहे. याशिवाय दक्षिण सालमारा, कोक्राझार, चिरांग आणि बस्का जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. ३०) ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला आहे. आसामच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार २८ जिल्ह्यांतील २४.९२ लाख लोकांना पुराचा फटका बसला. तत्पूर्वी ही संख्या २१.५२ लाखांवर होती. ब्रह्मपुत्रा, बेकी, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे अन्य नद्यांची पातळी मात्र घसरत आहे. पुरामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. याशिवाय तीन जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
८५ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी
सिल्चरमधील नागरिकांची घरे गेल्या दहा दिवसांपासून पाण्यात आहेत. त्यांना अन्नधान्यांच्या टंचाईबरोबरच पिण्याचे पाणी, औषधीदेखील उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. सुमारे १ लाख ७६ हजार २०१ नागरिक ५५५ छावण्यांत राहत आहेत. राज्यातील १५५ रस्त्यांची हानी झाली असून पाच पुलांची पडझड झाली. तसेच साडेपाच हजार घरांची हानी झाली. ८५,६७३,६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.