Rain Agrowon
ताज्या बातम्या

Konkan Rain : कोकणात जोरदार पावसाने पूरस्थिती

Team Agrowon

Konkan Monsoon News : गेले दोन दिवसांपासून पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील नद्यांची पातळी ही वाढली आहे. सध्‍या कोयना, राधानगरी, वारणा धरणांतून विसर्गास सुरुवात करण्यात आली आहे.

घाटमाथ्यावर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत संततधार, मराठवाड्यातील लातूर, नांदेड, विदर्भातील चंद्रपूर भागात पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वीस लघू प्रकल्प भरले आहे. कोकणातील व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमीअधिक होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर वाशिष्ठीचे पाणी चिपळूण शहरातील किनारी भागात शिरले. येथील बाजारपेठेतील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. तर जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

नदीची पाणीपातळी ७.४५ मीटर असून, धोका पातळी सात मीटर आहे. महाबळेश्‍वर परिसरात पाऊस पडला, की जगबुडीचे पाणी वाढते, ही परिस्थिती लक्षात घेऊन जगबुडीच्या किनारी गावांना दक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भातशेतीची कामे विनाअडथळा करता येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी सुरूच आहेत.

मंगळवारी (ता. २५) सकाळपासून काहीशी उघडीप दिलेल्या पावसाने दुपारनंतर मात्र जोर धरला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्पातून २४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या नदीची पाणीपातळी इशारा पातळीनजीक पोहोचली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली जिल्ह्यांत दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत हलका तर, काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. सांगलीतील शिराळा तालुक्याच्या वारणा धरण क्षेत्रासह पूर्व भागात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे भाताच्या रोपांची लागण करण्यासाठी शेतकरी नियोजन करण्यासाठी पुढाकार घेऊ लागला आहे. या भागात मंगळवारपासून (ता. १८) पावसाने सुरुवात केली.

रात्रभर हलका, जोरदार पाऊस पडला. पश्‍चिम भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या टोकण्या करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.

तर काही ठिकाणी आडसाली हंगामातील ऊस लागवड सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता. १९) दिवसभर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाची संततधार सुरूच राहिली. धरणक्षेत्रात पावसाचा जोर चांगला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ सुरू राहिली.

बुधवारी दुपारपर्यंत पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील यवलूज, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे, वेदगंगा नदीवरील निळपण व वाघापूर, कुंभी नदीवरील कळे व शेनवडे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव असे एकूण २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पुणे जिल्ह्यातही संततधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, खडकवासला, कळमोडी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खानदेश आणि नगर, सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या.

मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मागील दोन दिवसांपूर्वी या भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता या भागातील शेतातील पाणी कमी झाले आहे. मात्र सलग झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या भागातील नद्यांची पाणीपातळी कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, गडचिरोली या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळी कमी झाली असून, धरणांत आवक कमी झाली आहे.

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : (स्रोत - कृषी विभाग)

महाबळेश्‍वर १७५.८, दहिसर, बेलापूर, अप्पर १२९.५, देहरी १०१.५, धसइ, नयाहडी, सरळगाव ११६.५, उल्हासनगर, अंबरनाथ, गोरेगाव, बदलापूर १०४.५, कुमभर्ली १२९.५, पवयंजे १२९.५, नेरळ १३८.३, कडाव १०७, कळंब १०३.३, तलोजे १२९.५, आटोने १३२.३, बिरवडी १३३.५, नाटे, खारवली ११३,

निजामपूर १००.३, चिपळूण, खेर्डी ११४.५, मार्गताम्हाणे १२४, सावर्डे ११७.५, असुर्डे १००, कळकवणे, शिरगांव १६४.३, आंबवली, कुळवंडी १०३, भरणे १०५.५, धामणंद ११४.५, कडवी १०१.३, देवरुख १०४.८, आंगवली १०५.५, कोंडगाव १०३.५, आंबेगाव ११६.३, वेल्हा १३३.५, मोरगिरी, हेळवाक १०८.८, वरोरा १०५.५.

राज्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस : मिलिमीटरमध्ये

कोकण : ठाणे, बलकुम, मुंब्रा ६१.८, कल्याण ९७.५, टिटवाळा ९५.५, ठाकुरली ८४, नडगाव ७६, मुरबाड ७१, भिवंडी ८४, पडघा ८८, खारबाव ६१.८, शहापूर ७७.३, खर्डी ६०, पोयनड, चौल, रामरज ७०.८, ओवले, कर्नाळा ७८.३, मोराबी ७८.८, कर्जत ८८.८, कशेले ९३.३, चौक ८८.८, उरण ६३.५, कापरोली, जसई ७७.३, पाली ७७.३, जांभूळपाडा ७४.८, पेण ६६.५, कसू ७०.८, कामरली ६४.५, महाड ९७.५, तुडली, करंजवडी ९७.५, माणगाव ७४.५, इंदापूर ८६.५, गोरेगाव ९०.३, लोणेरे ९५.८, रोहा, नागोठणे ७०.८, कोलाड ७९, पोलादपूर, कोंडवी, वाकण ९७.५, नांदगाव ६२,

बोर्ली ७०.८, म्हसळा ६०.८, खामगाव ७२, तळा ८०.५, मेंढा ९४.५, रामपूर ९९.८, वहाळ ९८.८, दापोली, आंजर्ले ८८.५, वाकवली, पालगड ६८.८, वेळवी ८८.५, खेड ६८.८, शिर्शी ७९.८, दाभोळ ७९.८, गुहाघर ९७.८, तळवली ८५.८, पाटपन्हाळे ९७, आबलोली ७३, हेदवी ८८.३, मंडणगड ९०.८, म्हाप्रळ ९२.३, देव्हारे ८९.८, पाली ६४, मुरडव ८७.५, माखजन ९९.३, फणसवणे ९७.५, देवळे ७६.५, तेर्ये ८१.५, सौंदळ ७६.५, पाचल ७१.३, लांजा ६१.३, भांबेड ६९.५, पुनस ६१.३, विलवडे ६४.३, सावंतवाडी ६६.८, आंबोली ७६.८, माणगाव ६१.५, तळकट ७६.८, भेडशी ७८, पालघर कांचगड ६९.५, मनवर ७९.५, विक्रमगड ९१.८, तलवड ७१.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Pump Theft : कृषिपंपांच्या केबल, ठिबक चोरीचे सत्र थांबेना

Subhadra Yojana : वाढदिवसाच्या औचित्यावर मोदींनी सुरू केली सुभद्रा योजना, महिलांना मिळणार वार्षिक १०,००० रुपये

Rabi Season : शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीत रब्बी हंगाम व्यवस्थापनावर चर्चा

Agriculture Credit : शेतकऱ्यांना अर्थसाह्यासाठी स्टॅम्पपेपरची गरज नाही

Rainfed Farming : कोरडवाहू शेती तंत्रज्ञानात सुधारणेसाठी सूचना अपेक्षित

SCROLL FOR NEXT